शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ठरलं ! १८ जानेवारी रोजी दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देसरन्यायाधीश शरद बोबडे राहणार मुख्य अतिथी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सहमतीनंतरच १८ जानेवारी रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.नागपूर विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. फेरमूल्यांकनाचे निकाल मोठ्या प्रमाणात जाहीर झाले आहेत. हिवाळी परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. त्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांना निमंत्रित करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवले आहे. न्या. बोबडे यांनी १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कोणत्याही तारखेला मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु सरन्यायाधीशांना त्या तारखांना नागपुरात येणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्याच सोयीने वेळ मागितली. त्यांच्याकडून अखेर निश्चिती आली व १८ जानेवारी रोजी त्यांनी वेळ दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. १८ जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. या कार्यक्रमाला राज्यपालदेखील अपेक्षित होते. परंतु त्याच दिवशी मुंबईत ‘एसएनडीटी’ विद्यापीठाचादेखील दीक्षांत समारंभ आहे. त्यामुळे ते येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.सुरेश भट सभागृहात आयोजनसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीक्षांत समारंभाला येणार असल्यामुळे मान्यवरांचीदेखील उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने हे आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ