शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

नागपूर विद्यापीठ: ‘एमएड’च्या पदकावर ‘बीएड’ची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 10:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला मिळालेल्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आली आहे. आता विद्यापीठ यात बदल करून देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा अजब कारभार दीक्षांतची पदके तपासली कुणी ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान सुवर्णपदकांचा ‘वाद’ गाजला. ही बाब शांत होत नाहीच तो सुवर्णपदकांसंदर्भातील आणखी एक गलथानपणा समोर आला आहे. ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला मिळालेल्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आली आहे. भलत्याच अभ्यासक्रमाची नोंद सुवर्णपदकावर असल्यामुळे आता विद्यापीठ यात बदल करून देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात दानदात्यांकडून आलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके देण्यात येतात. ‘एमएड’ परीक्षा प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण करून सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल सुयश कॉलेज आॅफ एज्युकेशनच्या प्रियंका अरविंद दुबे यांना पाच सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. डॉ.जी.एस.पाराशर, विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षणविभाग रजत महोत्सवाचे सुवर्णपदक जाहीर झाले होते. शनिवारी झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना हे सुवर्णपदकदेखील प्रदान करण्यात आले. आपल्या मेहनतीचे चीज झाले या अत्यानंदात प्रियंका दुबे होत्या. परंतु घरी गेल्यानंतर ज्यावेळी सर्व पदके पाहिली तेव्हा संबंधित पदकावर ‘एमएड’ऐवजी चक्क ‘बीएड’मधील कामगिरीसाठी मिळालेले सुवर्णपदक अशी नोंद होती. जर अभ्यासक्रम ‘एमएड’चा होता तर सुवर्णपदकावर ‘बीएड’ अशी नोंद आलीच कशी असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.सुवर्णपदके तयार करताना विद्यापीठाकडून संबंधित कंत्राटदाराला विस्तृत यादी देण्यात येते. असे असतानादेखील अशी चूक कुठल्या पातळीवर झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या मुद्यावर चौकशी करून नेमके बोलता येईल, असे सांगितले. साधारणत: पूर्ण यादीच कंत्राटदाराला देण्यात येते. त्यामुळे जर असे झाले असेल तर पदक बदलून देण्यात येईल, असेदेखील ते म्हणाले.

तारेवरची कसरत करून मिळविले सुवर्णपदकप्रियंका दुबे-तोडकर यांनी अक्षरश: तारेवरची कसरत करून ‘एमएड’चे शिक्षण घेतले. लग्नानंतर सात वर्षांनी त्यांनी ‘बीएड’ केले व त्यानंतर ‘एमएड’ला प्रवेश घेतला. घरची सर्व कामे, तसेच लहान मुलीला सांभाळून त्यांना उमरेड-नागपूर असा प्रवासदेखील करावा लागायचा. परंतु पती उमाकांत (पप्पू) तोडकर यांचे प्रोत्साहन व आपल्या जिद्दीच्या बळावर त्यांनी अभ्यास केला. अभ्यासक्रमदेखील नवीन असल्याने त्यांना मेहनत करावी लागली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ