नागपुरात नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 07:00 IST2020-10-19T07:00:00+5:302020-10-19T07:00:14+5:30

corona Nagpur News नागपूर जिल्ह्यात ९ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ३७४ रुग्णाची नोंद झाली, तर २२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९०६७५ झाली असून मृतांची संख्या २९७४ वर पोहचली आहे.

In Nagpur, twice as many patients are cured as in new corona patients | नागपुरात नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

नागपुरात नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

ठळक मुद्दे९ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच कमी नोंद : ३७४ पॉझिटिव्ह तर ७१६ बरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची साथ नियंत्रणात येत असून रुग्णांचा आकडाही कमी व्हायला लागला आहे. नागपूर जिल्ह्यात ९ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ३७४ रुग्णाची नोंद झाली, तर २२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९०६७५ झाली असून मृतांची संख्या २९७४ वर पोहचली आहे. आज नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण, ७१६ बरे झाले. हे प्रमाण ८९.७३ टक्क्यांवर गेले आहे.

कोरोनाचा वेग मंदावतचा लोकांमध्ये बेफिकरी आली आहे. मास्क, फिजिकल डिस्टंसिंग व सॅनिटायझेशनचा वापर कमी झाला आहे. तज्ज्ञाच्या मते, कोरोना व्हायरस अजून देशातून हद्दपार झाला नाहीये. तो तितकाच धोकादायक आणि जीवघेणा आहे. यामुळे या काळात अधिक सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आज ३१०१ आरटीपीसीआर तर २१७३ रॅपीड अँटिजन असे एकूण ५२७४ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात अँटिजन चाचणीतून १४१ व आरटीपीसीआर चाचणीतून २३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

शहरात ११ तर ग्रामीणमध्ये ४ मृत्यू
शहरात आज ११, ग्रामीणमध्ये ४ तर जिल्हाबाहेरील ७ रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत २०६७, ग्रामीणमध्ये ५२३ तर जिल्हाबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३५७ आहे. नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २४२, ग्रामीणमधील १२५ तर जिल्हाबाहेरील ७ रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत एकूण ७०६९६, ग्रामीणमध्ये १९४४० तर जिल्हा बाहेरील ५३९ रुग्णांचा समावेश आहे.

मेडिकलमध्ये ४१७ संशयितांमधून ४ बाधित
मेडिकलच्या प्रयोशाळेत तपासण्यात आलेल्या ४१७ चाचण्यांमधून केवळ ४ रुग्ण बाधित असल्याचे निदान आले. या शिवाय, मेयोमध्ये ६६८ चाचण्यांमधून ४१, एम्समध्ये २४२ चाचण्यांमधून २०, माफसूमध्ये ९६ चाचण्यांमधून ३०, नीरीमध्ये ४१ चाचण्यांमधून सर्वच रुग्ण तर खासगी लॅबमध्ये१६३९ चाचण्यांमधून ९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्हात आतापर्यंत ५६११८७ रुग्णांच्या चाचण्या झाल्या.

 

Web Title: In Nagpur, twice as many patients are cured as in new corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.