शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नागपुरात तूर डाळ शंभरीकडे ! ग्राहकांचे कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 8:57 PM

सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ९० ते ९५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही वाढले आहेत. डाळीची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देदीड महिन्यात क्विंटलमागे दोन हजारांची वाढ, ९० रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ९० ते ९५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही वाढले आहेत. डाळीची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आले. तूर डाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात ६५ ते ६७ रुपये किलो भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच भाव ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी भाव प्रति क्विंटल २०० रुपयांनी घसरण झाल्याची माहिती धान्य बाजारातील ठोक विक्रेते व कॅन्व्हायसर रमेश उमाठे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आंब्याच्या हंगामामुळे मे महिन्यात भाव वाढणार नाही, असे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कापूस पिकावर लक्ष केंद्रित केले. कमी पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला. सर्व बाबी हेरून व्यापाऱ्यांनी डाळीचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूर डाळ पुन्हा १०० रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.उत्पादन कमी, मागणी जास्ततीन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति किलो १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते, शिवाय आयातही सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यातच तूर डाळीचे भाव ठोक बाजारात दर्जानुसार ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. या सर्व घडामोडीचा फटका व्यापाऱ्यांना बसला होता. अनेक दाल मिल बंद पडल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा साठा केलाच नाही. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत.शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आधारभूत किमतीत वाढगेल्या वर्षी तुरीला भाव कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारने आधारभूत किंमत ५,९०० रुपयांपर्यंत वाढविली होती. एवढ्या किमतीत तूर खरेदी करणारा व्यापारी वाढीव भावातच डाळ विकणार आहे. शिवाय तुरीचे पीक कमी आल्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर ताण येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरInflationमहागाई