Nagpur: मुलाला मारू नका म्हटले, पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, आरोपी पतीस अटक
By दयानंद पाईकराव | Updated: June 25, 2024 20:36 IST2024-06-25T20:35:34+5:302024-06-25T20:36:36+5:30
Nagpur News: मुलाला मारण्यास मनाई केल्यामुळे पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur: मुलाला मारू नका म्हटले, पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, आरोपी पतीस अटक
- दयानंद पाईकराव
नागपूर - मुलाला मारण्यास मनाई केल्यामुळे पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे.
संजय विनोदराय राठोड (३६, रा. गवळीपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. संजय मजुरी करतो. तो सोमवारी दुपारी आपल्या मुलाला विनाकारण मारहाण करीत होता. पत्नी आम्रपालीने ‘मुलाला विनाकारण मारु नका’असे म्हटले. त्यामुळे संतप्त झालेल्या संजयने रागाच्या भरात पत्नी आम्रपालीला मारहाण केली. शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून आम्रपालीला वाचविले. आरोपी संजयने यापूर्वी सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्रपालीने सीताबर्डी ठाण्यात तक्रार दिली. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी संजय विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.