शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: चोरट्या महिला टोळीचे आता रेल्वेस्थानक टार्गेट, दोघींना आरपीएफने केले गजाआड

By नरेश डोंगरे | Updated: March 18, 2024 20:49 IST

Nagpur News: गर्दीच्या ठिकाणी महिलांना घेरून त्यांच्याजवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या टोळीने आता रेल्वे स्थानक परिसराला टार्गेट केल्याचे उघड झाले आहे. पाच ते सात जणींच्या या टोळीतील दोघींना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

- नरेश डोंगरेनागपूर - गर्दीच्या ठिकाणी महिलांना घेरून त्यांच्याजवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या टोळीने आता रेल्वे स्थानक परिसराला टार्गेट केल्याचे उघड झाले आहे. पाच ते सात जणींच्या या टोळीतील दोघींना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. लता जयदेव नाडे (वय ४०) आणि काजल कृष्णा नाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघीही रामेश्वरी,अजनी भागात राहतात.

शहरातील अजनी, इमामवाडा तसेच कन्हान, कामठी आणि बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला चोरट्यांच्या टोळ्या राहतात. ५ ते ७ जणी एकाचवेळी बाहेर पडून गर्दीच्या ठिाकणी जातात. खास करून, बाजारपेठ, बसगाड्या, रेल्वेगाड्यावर त्यांची वक्रदृष्टी असते. लगबगीने गाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या मागेपुढे होऊन त्या सावज म्हणून हेरलेल्या महिलांचे लक्ष विचलित करतात आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने किंवा पर्समधील दागिने आणि रोख रक्कम बेमालूमपणे लंपास करतात.

रविवारी त्या नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर सावज शोधत होत्या. त्यांचे संशयास्पद वर्तन पाहून तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक एल.एच. मिना, कर्मचारी मनोजकुमार पांडे, कपिल झरबडे, नीरजकुमार आणि दीपा कैथवास यांनी त्यांच्यावर नजर रोखली. लता आणि काजल नाडेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या उलटसुलट उत्तरे देऊ लागल्या. आरपीएफच्या ठाण्यात नेऊन त्यांची पीएसआय अनुराधा मेश्राम यांनी चाैकशी केली असता त्या चोरीच्या ईराद्याने रेल्वे स्थानकावर आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ८ मार्चला गाडी क्रमांक १२१५९ जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून ७ हजारांची रोकड चोरल्याची कबुली दिली. या चोरीच्या संबंधाने रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल असल्याचे उघड झाल्यानंतर ठाणेदार आर. एल.मिना यांनी या दोघींना पुढील चाैकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले.

साथीदार पळाल्यालता आणि काजलच्या सोबत आणखी काही महिला होत्या. आरपीएफचे जवान या दोघींकडे येत असल्याचे पाहून त्या तेथून सटकल्या. या टोळीने आणखी काही चोऱ्या केल्या असाव्या, असा संशय आहे. रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर