नागपुरात साडेतीन हजारावर मतदार शंभरीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:32+5:302021-02-05T04:56:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंतिम मतदार यादी नुकतीच जारी करण्यात आली आहे. या नवीन मतदार यादीनुसार नागपूर जिल्ह्यात ...

नागपुरात साडेतीन हजारावर मतदार शंभरीपार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतिम मतदार यादी नुकतीच जारी करण्यात आली आहे. या नवीन मतदार यादीनुसार नागपूर जिल्ह्यात तब्बल ३,७७४ मतदार हे वयाची शंभरी पार केलेले आहेत. यात सर्वाधिक ५२६ शंभरी पार केलेले मतदार हे दक्षिण-पश्चिम नागपुरात आहेत. तर सर्वात कमी १२ शंभरी पार मतदार काटोल विधानसभा मतदार संघात आहेत.
जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार नागपूर जिल्ह्यात ४२ लाख ३० हजार ७५३ मतदार आहेत. निवडणूक विभागातर्फे वर्षातून दोनवेळा मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविले जाते. यात तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतो. याही वेळी तो मिळाला. असे १८ ते १९ वर्षाचे तरुण मतदार जिल्ह्यात ५०,८८० इतके आहेत. २० ते २९ वर्षाचे मतदार ७ लाख ७ हजार ७१७ इतके आहेत. ३० ते ३९ वयोगटातील १० लाख २७ हजार ८७ मतदार आहेत. ४० ते ४९ वयोगटातील १० लाख ६ हजार ३२८ मतदार आहेत. ५० ते ५९ वयोगटातील ६ लाख ८२ हजार ४८३ मतदार, ६० ते ६९ वयोगटातील ४ लाख ५ हजार २६१ मतदार, ७० ते ७९ वयोगटातील २ लाख २४ हजार ३११ मतदार, ८० ते ८९ वयोगटातील ९८ हजार ९६९ मतदार आणि ९० ते ९९ वयोगटातील २३ हजार ९४३ मतदार नागपूर जिल्ह्यात आहेत.
असे आहेत तालुकानिहाय शंभरी पार करणारे मतदार
काटोल - १२
सावनेर - २७८
हिंगणा - २१७
उमरेड - १७१
कामठी - २४८
रामटेक - ३६९
दक्षिण-पश्चिम नागपूर- ५२६
दक्षिण नागपूर- ३७३
पूर्व नागपूर - ३१३
मध्य नागपूर - ४७३
पश्चिम नागपूर - ४७२
उत्तर नागपूर - ३२२
---------------------
एकूण - ३,७७४