शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 15:52 IST

मनपा रुग्णालयात उपचाराची सोय नाही.

नागपूर :स्वाईन फ्लूच्या वाढत्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत १०८ रुग्णांची नोंद झाली असून, ३० टक्के म्हणजे ३३ रुग्णांचे जीव गेले आहेत. धक्कादायक म्हणजे, मेडिकल व एम्स सोडल्यास अद्यापही मेयोसह महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचाराची सोय नाही.

उपराजधानीत एकीकडे गणेश उत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी २४ बेडचा वॉर्ड क्र. १३ राखीव ठेवला आहे. सध्या येथे १२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर तर चार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२२ या दरम्यान या वॉर्डात १०८ रुग्णांनी उपचार घेतले, यातील ३३ रुग्णांचा जीव गेला आहे.

कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे ५१ टक्के मृत्यू

नागपूर जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान कोरोनाचा १८ मृत्यूची नोंद झालीे. १ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२२ या काळात एकट्या मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूचे ३३ मृत्यू झाले. एकूणच कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे ५१ टक्के मृत्यू झाले. हा धोका ओळखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

स्वाईन फ्लूचे १०३ रुग्ण भरती

शहरासह ग्रामीण व इतर जिल्ह्यातील मिळून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३८६ झाली आहे. यातील १०३ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत. यातील १० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

आकडेवारी जमा करण्यापुरतीच मनपा मर्यादित

२००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, १३ वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या एकाही रुग्णालयात या रुग्णांना भरती करण्याची सोय उभी केली नाही. आता तर मेयोनेही जागा नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. यामुळे रुग्णांचा भार एम्स व मेडिकलवर आला आहे. यातही एम्स शहराबाहेर असल्याने सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येत आहेत.

उशिरा निदान मृत्यूचे ठरतेय कारण

डॉक्टरांनुसार, कोरोनाचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेत गंभीर स्वरूपातील कोरोना झालेल्यांमध्ये स्वाईन फ्लूची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूचे उशिरा निदान होऊन त्यांना उशिरा उपचार मिळत असल्याने आजाराची गुंतागुंत वाढून मृत्यूचा धोका वाढला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूnagpurनागपूरDeathमृत्यू