नागपुरात स्विमिंग ट्रेनर तलावात बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 23:08 IST2020-10-18T23:08:26+5:302020-10-18T23:08:49+5:30

Nagpur News गोरेवाडा तलावात मित्रासोबत पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

In Nagpur, a swimming trainer drowned in a lake | नागपुरात स्विमिंग ट्रेनर तलावात बुडाला

नागपुरात स्विमिंग ट्रेनर तलावात बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गोरेवाडा तलावात मित्रासोबत पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. जयराज योगीराज निहारे (वय २२) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून, तो चांगला स्विमर तसेच ट्रेनर होता, असे समजते. त्याला शोधून काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. मात्र जयराज हाती लागला नाही.

विशेष म्हणजे, जयराज अनेकांना पोहायला शिकवायचा. तो आणि त्याचे दोन मित्र नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गोरेवाडा तलावावर पोहायला गेले. जयराज आणि एक पोहायला लागले. तर, सोबतचा एक तरुण काठावर बसला. काही वेळेनंतर आतमध्ये गेलेला जयराज पाण्यावर आला नसल्याने सोबत पोहणाऱ्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो दिसत नसल्याने तो पाण्यावर आला. नंतर काठावर बसलेल्याला सांगून या दोघांनी पोलिसांना कळविले. गिट्टीखदान पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान गोरेवाडा तलावावर पोहचले. त्यांनी रात्रीपर्यंत जयराजला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र तो आढळला नाही. अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.

तलावावर मोठी गर्दी
तरुण तलावात बुडाल्याचे कळाल्याने पीडब्ल्यूडी कॉलनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी ८ वाजता शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे गिट्टीखदान पोलिसांनी लोकमतला सांगितले.
 

 

Web Title: In Nagpur, a swimming trainer drowned in a lake

टॅग्स :Deathमृत्यू