अक्षयतृतीयेला नागपूरच्या बाजारात गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:58 IST2018-04-18T23:58:25+5:302018-04-18T23:58:37+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयतृतीयेला शहरातील सराफा दुकानात चांगलीच धनवर्षा झाली.

अक्षयतृतीयेला नागपूरच्या बाजारात गोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयतृतीयेला शहरातील सराफा दुकानात चांगलीच धनवर्षा झाली. लग्नसमारंभासाठी नागरिकांनी आपल्या पसंतीनुसार नव्या डिझाईनचे दागिने खरेदी केले. यामुळे शहरात कोट्यवधी रुपयांचे दागिने विकल्या गेल्याचा अंदाज आहे. तर एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे खरेदीवर प्रभाव पडल्याचे पाहावयास मिळाले.
शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक राजेश रोकडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यावर्षी अक्षयतृतीयेला अपेक्षेपेक्षा खूप चांगला व्यवसाय झाला. शहरात तीन हजारापेक्षा अधिक सराफा दुकाने आहेत. या दुकानात दिवसभर ग्राहकांची रेलचेल सुरू होती. अक्षयतृतीयेनिमित्त सराफा व्यापाºयांनी नव्या डिझाईनचे विशेष दागिन्यांचे कलेक्शन सादर केले होते. या दागिन्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळातील लग्नसमारंभासाठी नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी दागिन्यांची खरेदी केली. यामुळे एकाच दिवशी शहरभर कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. यात शहरातील गारमेंट शो रुममध्येही दिवसभर ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळाली. लग्नाची शेरवानी, वधूचा लहंगा, सुट आदीची जोरात विक्री झाली. आॅटोमोबाईल शो रुममध्येही गर्दी होती. येथे आधी बुक केलेल्या वाहनांची अक्षयतृतीयेला डिलिव्हरी करण्यात आली. नागरिकांनी या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी केली. इतवारीच्या भांडेओळ, सीताबर्डीतील मोबाईल मार्केटमध्ये चांगला व्यवसाय झाल्याची माहिती आहे.
क्रेडिट कार्ड, चेकने दिले पैसे
अक्षयतृतीयेला खरेदीसाठी बाजारात गेलेल्या ग्राहकांना एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे अडचण आली. सराफा दुकानात दागिने पसंत केल्यानंतर त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे अनेक ग्राहकांनी क्रेडिट/डेबिट कार्ड आणि चेक देऊन रक्कम चुकती केली. ते काही असो अक्षयतृतीयेनिमित्त दुकानदारांची चांदी झाली, हे विशेष.