शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल; नावाचेच ‘सुपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:05 AM

अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) करणारे महाराष्ट्रातील नागपूरचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे पहिलेच आणि एकमेव शासकीय रुग्णालय आहे.

ठळक मुद्देमंजूर ५२५ पदांपैकी १५७ पदे रिक्त

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) करणारे महाराष्ट्रातील नागपूरचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे पहिलेच आणि एकमेव शासकीय रुग्णालय आहे. रुग्णालयातून चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याने, रुग्णांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत एक लाखाने लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु त्यातुलनेत मंजूर असलेली ५२५ पदे तोकडी पडत आहेत. यातही १५७ पदे रिक्त आहेत. याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. नावाचेच ‘सुपर’ असल्याचे बोलले जात आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८ साली रुग्णसेवेत सुरू झाले. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्ररोग (यूरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु सकाळ, दुपार आणि सायंकाळ या तीन पाळीत रुग्णांना सांभाळणारे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांची वानवा आहे. अशा बिकट अवस्थेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाह्यरुग्ण विभागासोबतच आंतररुग्णातही वाढ झाली आहे.विशेष म्हणजे, रुग्णालयातील मंजूर खाटांची संख्या १२० वरून १८० वाढविण्यात आली.आता यात यूरोलॉजी विभागात ३०, न्यूरोलॉजी विभागात २० तर एन्डोक्रेनॉलॉजी विभागात २० खाटांची भर पडणार आहे. त्यातुलनेत वर्ग १ ते वर्ग ४ ची पदे मानकानुसार कमी पडत आहेत. अशा बिकट अवस्थेत हॉस्पिटलची ‘सुपर’ रुग्णसेवा सापडली आहे.

चार वर्षांत एक लाखाने वाढले रुग्णसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात २०१४ मध्ये ४६,२०९ रुग्ण, २०१५ मध्ये ४१,०८८ रुग्ण, २०१६ मध्ये ८१,१८० रुग्ण, २०१७ मध्ये १,२३,८६९ रुग्ण तर २०१८ मध्ये १,५४,२३८ रुग्णांनी उपचार घेतले. गेल्या चार वर्षांत यात एक लाख आठ हजार २९ रुग्णांची संख्या वाढली आहे. आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे.

२०१६ मध्ये वाढलेली पदे भरलीच नाहीतरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने २०१६ मध्ये १३५ वाढीव पदांना मंजुरी दिली. यामुळे जुनी ३९० मंजूर पदे ५२५वर पोहचली. मात्र दोन वर्षे होऊनही नव्याने मंजूर केलेली पदेच भरण्यात आलेली नाही. यामुळे १५७ पदे आजही रिक्त आहेत. यात सर्वात जास्त पदे वर्ग एक ते तीन आणि वरीष्ठ निवासी डॉक्टरांची आहेत. ३५ काल्पनिक मंजूर पदापैकी एकही पद भरण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्य