शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

नागपुरात 'कुछ तो नया है...!' १७ ला उघडणार पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:00 PM

कुछ तो नया है..! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून काही तरी नवीन जन्माला येतेय. तरुणाईसाठी स्पेशल आणि नागरिकांसाठीही काही तरी नवे, काही तरी चांगले बघायला मिळणार आहे. पण हे नवे काय, याची प्रचंड उत्सुकता नागपूरकरांमध्ये ताणलेली आहे.

ठळक मुद्दे नागपूरकरांसाठी महापौरांचा अफलातून उपक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कुछ तो नया है..! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. महापौरसंदीप जोशी यांच्या संकल्पनेतून काही तरी नवीन जन्माला येतेय. तरुणाईसाठी स्पेशल आणि नागरिकांसाठीही काही तरी नवे, काही तरी चांगले बघायला मिळणार आहे. पण हे नवे काय, याची प्रचंड उत्सुकता नागपूरकरांमध्ये ताणलेली आहे. काय आहे हे नवे हे जाणून घेण्यासाठी सोमवार १७ फेब्रुवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे कारण याच दिवशी ‘कुछ तो नया है...’ वरून पडदा उघडणार आहे.संदीप जोशी यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सतत काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नागरिकांचा सहभागाशिवाय शहराचा विकास शक्य नाही, हे जाणत ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’, ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’, शहरस्तरावरचे तक्रार निवारण शिबिर, झोनस्तरावर ‘जनता दरबार’ आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी ‘मम्मी पापा यू टू’ आदी अभियान त्यांनी राबविले. आता ही नवी संकल्पना अफलातून असेल, असे सांगण्यात येत आहे. अंबाझरीजवळ विवेकानंद स्मारक येथे काही तरी नवे साकारले जात आहे. यासाठी शहरातील काही तरुणाई एकत्र आली आहे. तरुणाईच्या सहकार्याने ही संकल्पना साकारली जात असून या माध्यमातून एक नवी चळवळ सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. विवेकानंद स्मारकावर १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता महापौर याची घोषणा करण्यात आसल्याची माहिती त्यांनी दिली.यादरम्यान विवेकानंद स्मारकाला शहरातील नागरिकांनी भेट द्यावी, जे काही तेथे नवे दिसेल त्यासंदर्भात आपल्याला काय वाटते, त्यामागे काय असू शकते, हे सुद्धा आपण सांगू शकता. आपण विवेकानंद स्मारकाला भेट दिली असेल आणि नवे काही तरी बघितले असेलच. बघितलेले नवे काय आहे, काय असू शकते, महापौरांची संकल्पना काय असू शकते, याबाबत ‘हॅलो महापौर’ या अ‍ॅपवर अभिप्राय कळविण्याचे आवाहन त्यांनी केले. हा मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा आणि त्यावर या नव्या संकल्पनेबाबत आपले अंदाज व्यक्त करा आणि प्रत्यक्ष नवे काय आहे, हे जाणण्यासाठी ठरलेल्या वेळी नागरिकांनी स्मारकस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका