शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:44 AM

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शासकीय जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर वसलेल्या अतिक्रमणधारी झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय सोमवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देनासुप्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णयचर्मकार समाजाला रविदास भवनासाठी जागा देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शासकीय जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर वसलेल्या अतिक्रमणधारी झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय सोमवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.यावेळी नासुप्रचे सभापती तथा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल,नासुप्रचे विश्वस्त तथा मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, विश्वस्त भूषण शिंगणे, अप्पर जिल्हाधिकारी(एनएमआरडीए) सुधाकर कुळमेथे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर आदी उपस्थित होते. प्रारंभी अभिजित बांगर यांचे अश्विन मुदगल यांनी स्वागत केले.मौजा नारी खसरा क्र. १०९,११० (भाग) येथील मंजूर विकास योजनेत प्रस्तावित दवाखाना (एमएन-१३ ) आणि खसरा क्र. ९७ (भाग) मौजा नारी येथे प्रस्तावित पार्क (एमएन-२९ ) या जागांची अदलाबदल करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये उपयोग फेरबदलाचा प्रस्ताव शिफारस प्रदान करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.उत्तर नागपुरातील मौजा नारी येथील नासुप्रच्या मालकीच्या जागेवरील सहयोग नगर क्रीडांगण देखभाल, दुरुस्ती व विकास करण्याकरिता नागपूर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्मार्ट सिटी योजनेसाठी नगर रचना परियोजना राबविण्याकरिता 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्याला मंजुरी देण्यात आली.मौजा चिखली (देवस्थान) ख.क्र. ७३(भाग), ९४(भाग), १०२(भाग), क्षेत्र ५.७०७२ हेक्टर जागेचा विकास योजनेतील मार्केट (एमइ-९)या आरक्षणातून वगळून वाणिज्य (क्षेत्र ३.७०७२ हेक्टर) व औद्योगिक (क्षेत्र २.०० हेक्टर) उपयोगात समाविष्ट करण्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये फेरबदलाची प्रक्रिया करण्यास मंजुरी देण्यात आली.संत रविदास भवनासाठी जागाचर्मकार समाजासाठी नागपूर शहरात श्री संत रविदास भवन शासनाकडून बांधून मिळवण्यासाठी नासुप्रद्वारे मौजा बाभुळखेडा ख.क्र. ७४/१ क्षेत्रफळ ३६४६.७० चौ.मी. जागेचे वाटप करण्यासाठी, नासुप्र जमीन विनियोग नियम १९८३ अंतर्गत कोणताही भूखंड,जागेचे थेट वाटप करण्याचे प्रावधान नाही. त्यामुळे नियम ५(२) आणि सुधारणा नियम २०१६ मधील नियम २०(२)(अ) ला शासनाकडून नियम २६ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारात शिथिलता प्रदान करण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यास विश्वस्त मंडळाने मान्यता प्रदान केली. शासन मंजुरीनंतर भवनासाठी जागा उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासnagpurनागपूर