शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात एकाच दिवशी सहा वस्त्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:53 AM

महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ झोनमधील एस.के.बॅनर्जी मार्ग या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

ठळक मुद्देस्वीपर मोहल्ला,गड्डीगोदाम, शबरीमाता नगर, बिनाकी सोनार टोली, चंद्रमणी नगर व एस.के.बॅनर्जी मार्गाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ झोनमधील एस.के.बॅनर्जी मार्ग या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.स्विपर मोहल्ला (लालगंज)प्रतिबंधित क्षेत्रउत्तर पश्चिमेस - महतो यांचे घरउत्तरेस- प्रकाश महतो यांचे घरउत्तर पूर्वेस -शेख यांचे घरदक्षिण पूर्वेस - कृष्ण पराते यांचे घरदक्षिणेस -सुदर्शन समाज भवनदक्षिण पश्चिमेस - आशा फुलझेले यांचे घरबिकाकी सोनार टोली प्रतिबंधित क्षेत्रउत्तर पश्चिमेस -दुर्गा माता मंदिरउत्तर पूर्वेस-गोवर्धन पाटीलदक्षिण पूर्वेस -गजानन देवीकरदक्षिण पश्चिमेस-सावजी भोजनालयगड्डीगोदाम प्रतिबंधित क्षेत्रदक्षिण पश्चिमेस -जयस्वाल रेशन शॉपदक्षिण पूर्वेस -युवराज साखरे यांचे घरदक्षिण पश्चिमेस -किशोर साहू यांचे घरपश्चिमेस -अन्नपूर्णा मंदिरपश्चिमेस -गड्डीगोदाम चौकउत्तरेस -गुरुव्दारा जवळील रेल्वे गेटपूर्वेस -फेमस लायब्ररीशबरीमाता नगर प्रतिबंधित क्षेत्रदक्षिण पश्चिमेस-गौतम यांचे घरदक्षिण पूर्वेस -राजेश चौगले यांचे घरउत्तर पश्चिमेस-तिवारी आटा चक्कीउत्तर पूर्वेस- दिलीप राऊत यांचे घरचंद्रमणीनगर प्रतिबंधित क्षेत्रउत्तर पश्चिमेस -बॉबी किराणादक्षिण पश्चिमेस -विनायक मेश्राम याचे घरदक्षिण पूर्वेस -विमल गडपायले याचे घरउत्तर पूर्वेस -मालाधारी (सुभाष डोंगरे)एस.के.बॅनर्जी मार्ग प्रतिबंधित क्षेत्रपश्चिमेस -गद्रे यांचे घराजवळउत्तरेस - प्रफुल्ल जोशी यांचे घराजवळपूर्वेस - आशीर्वाद पॅलेस समोरील रस्तादक्षिणेस-माईल्ड स्टोन बिल्डिंगसहा भागातील प्रतिबंध हटविले, नागरिकांना दिलासामागील २८ दिवसात कोणताही कोविड-१९ चा रुग्ण आढळून न आल्याने शनिवारी शहरातील सहा भागातील प्रतिबंध हटविण्यात आले. यात धंतोली झोनमधील तीन तर मंगळवारी, धरमपेठ व हनुमाननगर झोनमधील प्रत्येकी एका भागाचा समावेश आहे.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच शहरातील दीड डझन वस्त्यातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत, तर तीन डझन क्षेत्रात अजूनही प्रतिबंध कायम आहे.शनिवारी प्रतिबंध हटविण्यात आलेल्या धरमपेठ झोनमधील प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले-आऊट सुदामनगरी, पांढराबोडी व धंतोली झोनमधील प्रभाग ३५ मधील पार्वतीनगर येथील नागरिकांनी १४ दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने प्रतिबंध हटविण्यात यावे, यासाठी आंदोलन केले होते. पांढराबोडी येथे सतत तीन दिवस आंदोलन करण्यात आले. पार्वतीनगरातही असंतोष उफाळून आला होता. परंतु नियमानुसार २८ दिवसात कोणताही रुग्ण आढळून न आल्यास प्रतिबंध हटविले जाते. या दोन्ही भागात रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली होती. प्रतिबंध हटविण्यात आल्याने आता या भागातील रहदारी पूर्ववत सुरू होईल. जीवनावश्यक वस्तूंसोबतच अन्य दुकाने सशर्त उघडली जातील.येथील प्रतिबंध हटविण्यात आलेकुशीनगर, प्रभाग ३३ - मंगळवारी झोनट्रस्ट ले-आऊट सुदामनगरी, पांढराबोडी, प्रभाग १३ - धरमपेठ झोनहुडको एसटी क्वॉर्टर गणेशपेठ, प्रभाग १७ - धंतोली झोनजयभीमनगर प्रभाग ३३ - धंतोली झोनपार्वतीनगर, प्रभाग ३५ - धंतोली झोनकाशीनगर टेकाडे हायस्कूल, प्रभाग ३४ - हनुमाननगर झोन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर