शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर कुडकुडले, शीतलहर कायमच : पावसाने वातावरण थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:27 IST

गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देवर्धा, नागपुरात हलक्या पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.  

नववर्षाचा पहिलाच दिवस पावसाचा ठरला. नागपूर शहरात दिवसा पाऊस आला. रात्रीही पावसाने उसंत घेतली नाही. रात्री सुमारे १२ वाजतानंतर आलेला पाऊस रात्री पाऊण तासापर्यंत सुरू होता. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्यांना आपल्या आनंदाला आवर घालावा लागला. 
३१ डिसेंबरच्या रात्री केवळ नागपूर शहरातच नव्हे तर विदर्भातील अन्य जिल्ह्यातही हलक्या आणि मध्यम हलक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद वर्धा जिल्ह्यात १०.४ मिमी झाली असून, त्यापाठोपाठ नागपूर शहरात ८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये ३.८ मिमी पाऊस पडला तर ब्रह्मपुरीध्ये २.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मागील २४ तासात तापमानाचा पारा बराच खालावला आहे. पाऊस पडून गेल्याने थंडी वाढली. त्यामुळे ही शीतलहर पसरली आहे. हवामान खात्याने मागील १२ तासात पावसासह गारांचा इशारा दिला होता. मात्र बुधवारी दिवसभर पाऊस पडला नाही. ढगाळी वातावरण सायंकाळर्यंत कायम होते. येत्या १२ तासानंतर ढगाळी वातावरण दूर झाल्यावर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.गेल्या २४ तासांमध्ये नागपुरातील कमाल वातावरणात बदल झाला असून, तापमान २.९ अंशाने घसरले आहे. शहरातील कमाल तापमानात २३.१ अंश सेल्सिअसने तर किमान तापमानात ०.४ ने घट झाली आहे. वर्ध्यामध्येही पारा २२ अंशावरून ३ ने खालावला आहे. अमरावतीमध्ये कमाल तापमानात ३.८ ने घट झाली. चंद्रपुरात ०.४ अंशाने, तर यवतमाळात ०.५ ने कमाल तापमानात घट झाली आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसnagpurनागपूर