शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

अब तक ३७, खुनाच्या घटनांनी हादरतेय नागपूर; गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By योगेश पांडे | Updated: July 26, 2022 10:55 IST

फेब्रुवारी होता ‘झिरो मर्डर’ महिना

योगेश पांडे

नागपूर : फेब्रुवारी महिना नागपूरसाठी ‘झिरो मर्डर’ महिना ठरला होता व त्यावरून शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र फेब्रुवारी महिना सरला आणि शहरात हत्येच्या घटना परत सुरू झाल्या. मागील काही दिवसांत तर खुनांच्या घटनांची मोठी चर्चा होत आहे. १ जानेवारी ते २५ जुलै या कालावधीत नागपुरात ३७ खून झाले. विशेषत: जुलै महिन्यातील खुनाच्या घटनांमुळे शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

नागपूर शहरात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण २० खून झाले होते. त्यानंतर २५ जुलैपर्यंत आणखी १७ खुनांची भर पडली. मागील वर्षी जानेवारी ते २५ जुलै या कालावधीत शहरात ४६ खून झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आकडा कमी असला तरी फेब्रुवारी महिन्यात शहरात एकाही खुनाची नोंद झाली नसताना त्यानंतर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांकडूनदेखील लहानसहान कारणांवरून खून करण्यात आल्याच्या घटना यावर्षी घडल्या आहेत.

एमआयडीसीत सर्वाधिक खून

काही दिवसांअगोदरच खुनांच्या घटनांवरून तीन पोलीस ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. या वर्षभरात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सर्वाधिक सहा खून झाले. त्यापाठोपाठ जरीपटका येथे पाच खून झाले. कळमना, सदर, नंदनवन, पारडी, हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाच्या प्रत्येकी दोन घटना घडल्या. याशिवाय अजनी, वाडी, वाठोडा, कोतवाली, कपिलनगर, तहसील, गणेशपेठ, कोराडी, बजाजनगर, राणाप्रतापनगर, सोनेगाव, लकडगंज, पाचपावली, बेलतरोडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक खून नोंदविण्यात आला.

किरकोळ कारणातून खून

काही घटनांमध्ये किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली जाते. त्यामुळे गंभीर जखमी होऊन संबंधिताचा मृत्यू होतो. यात काही घटनांमध्ये आरोपी आणि खून झालेली व्यक्ती हे एकमेकांच्या ओळखीचेही नसल्याचे समोर आले आहे. शंकरनगर चौकात कुख्यात शेखूच्या भावाचा खून ऑटोला कट लागल्याच्या कारणातून झाला. आर्थिक मुद्दे, संशय, सततचे वाद या कारणांतून टोकाचे निर्णय घेतले जातात. काही प्रकरणांमध्ये कट रचूनदेखील खून केला जातो. मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये राग अनावर होत असल्याने असे प्रकार घडत आहेत.

दोन डबल तर एक ट्रीपल मर्डर

या कालावधीत नागपुरात एक ट्रीपल मर्डर झाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने पत्नी व मुलांना ठार मारले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन डबल मर्डरची नोंद झाली. या सर्व खुनांमध्ये आरोपी जवळचा नातेवाईकच होता.

खुनाच्या प्रयत्नांचे ५३ गुन्हे

दरम्यान, खुनाच्या उद्देशाने हल्ला केल्याचे या कालावधीत नागपुरात ५३ गुन्हे नोंदविण्यात आले. जानेवारी ते एप्रिलपर्यंत हा आकडा ३५ पोहचला होता. तर त्यानंतर १८ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक भट यांनी स्वत:ला जाळून घेत पत्नीचादेखील खून केला. तर मुलगा नंदनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

२०२२ मधील महिनानिहाय खून

महिना - खून

जानेवारी - ५

फेब्रुवारी - ०

मार्च - ११

एप्रिल - ४

मे - ६

जून - ४

जुलै (२५ तारखेपर्यंत) - ७

चौकट

जानेवारी ते २५ जुलै २०२१ - ४६

जानेवारी ते २५ जुलै २०२२ - ३७

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर