शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-शहडोल एक्स्प्रेस सुरू होण्यापूर्वीच झाली बंद; नवीन गाडीला प्रशासनाकडून ब्रेक  

By नरेश डोंगरे | Updated: August 29, 2023 20:27 IST

मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला आणि ४८ तासांतच या निर्णयाला आकस्मिक ब्रेकही लावला.

नागपूर : मध्य रेल्वेनेनागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला आणि ४८ तासांतच या निर्णयाला आकस्मिक ब्रेकही लावला. यामुळे मध्य प्रदेशातील प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या शहडोल - नागपूर या विशेष गाडीचा श्रीगणेशा मंगळवार, २९ ऑगस्टपासून होणार होता. तर, ४ सप्टेंबरपासून नागपूर - शहडोल एक्स्प्रेस दर मंगळवारी धावणार अशी रितसर घोषणा रविवार, २७ ऑगस्टला मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. विशेष म्हणजे, नागपुरात चांगली आरोग्य सेवा मिळत असल्यामुळे येथे दररोज मध्य प्रदेशमधील विविध गाव-शहरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, खासगी बस किंवा खासगी वाहनाने रुग्णांना येथे आणणे आणि परत घेऊन जाणे मोठ्या खर्चाचे ठरते. त्यामुळे ही मंडळी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे मध्य प्रदेशमधून नागपूरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकडच्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे मध्य प्रदेशातील अनेकांना दिलासा मिळाला होता.

शहडोल ते नागपूर ही पहिली गाडी २९ ऑगस्टला प्रवासाला सुरूवात करेल आणि या मार्गावरील उमरिया, कटनी साऊथ, जबलपूर, शिवनी, छिंदवाडा आणि साैंसर येथे या रेल्वेगाडीचा थांबा राहील, असेही सांगण्यात आल्याने अनेक प्रवासी या गाडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अचानक काय झाले कळायला मार्ग नाही. आज अचानक दर सोमवारी (नागपुरातून) आणि मंगळवारी (शहडोल) धावणारी ही गाडी रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. कृपया, प्रतीक्षा करा या गाडीला सुरू होण्यापूर्वीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने कोणत्या कारणामुळे घेतला, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान, ही नवीन साप्ताहिक गाडी कधी सुरू होणार, तेसुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. पुढची सूचना मिळेपर्यंत प्रवाशांनी कृपया प्रतीक्षा करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे