शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Nagpur: सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 10, 2023 11:59 IST

Nagpur News: राज्यातील नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.

- राकेश घानोडेनागपूर - राज्यातील नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचेआरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. परंतु, कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

सरपंच पदाच्या आरक्षणात दुरुस्ती व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत काळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी निर्णय दिला. राज्य सरकारने ५ मार्च २०२० रोजी अधिसूचना जारी करून राज्यातील सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले. त्यानंतर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आरक्षणासंदर्भात २५ नोव्हेंबर २०२० रोजी अधिसूचना जारी केली. त्यानुसार, नागपूर जिल्ह्यातील सरपंचाची ७६८ पैकी ४३७ पदे मागासवर्गीयांसाठी आरक्षित केली गेली आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे व खुल्या प्रवर्गात केवळ ३३१ पदे शिल्लक राहिली आहेत. इतर काही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने के. कृष्णमूर्ती प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यापूर्वी सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी होती.

राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचreservationआरक्षणHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर