शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:54 IST

नागपुरातील महाल परिसरात चोरीची घटना घडली. मुलीचे लग्न करण्यासाठी अमरावती येथे गेलेल्या एका व्यापारी कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी २४.६६ लाख रुपये ...

नागपुरातील महाल परिसरात चोरीची घटना घडली. मुलीचे लग्न करण्यासाठी अमरावती येथे गेलेल्या एका व्यापारी कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी २४.६६ लाख रुपये नेले. चोरीचा संपूर्ण घटनाक्रम शेजारच्या एका मुलाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

संकेत हरीश जसानी (वय, ३१) असे पोलिसांत फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जसानी कुटुंब प्लास्टिकच्या वस्तू बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतात. रविवारी संकेतच्या मुलीच्या लग्नानिमित्त अमरावती येथे लग्न होते. त्यामुळे शनिवारी रात्री संपूर्ण कुटुंब नातेवाईकांसह अमरावतीला रवाना झाले. त्याच दिवशी रात्री उशीरा चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. 

पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी संकेत यांच्या घरातून पाच लाख रुपयांची रोकड, सोने- हिऱ्यांचे दागिने आणि महागड्या घड्याळ्यांसह २४.६६ लाख रुपयांचा माल चोरून नेला. रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी जसानी कुटुंबाला चोरीची माहिती दिली. माहिती मिळताच संकेतने नागपूर गाठले आणि कोतवाली पोलिसांना कळवले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी संकेत यांच्या शेजारी राहणारा १६ वर्षाचा मुलगा आपल्या घराच्या छतावर मोबाईलमध्ये गेम खेळत होते. पहाटे २.४० वाजताच्या सुमारास त्याला जसानीच्या घरासमोर एक कार उभी असलेली दिसली. या गाडीतून दोन जण खाली उतरले आणि जसानी यांच्या घराचे कुलूप तोडून आत गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने बाहेर आले. हा संपूर्ण प्रकार शेजारच्या मुलाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. लग्नाच्या काही तास आधी घरात चोरी झाल्याचे कळताच जसानी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रtheftचोरी