शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या तिघांना आरपीएफने ठोकल्या बेड्या

By नरेश डोंगरे | Updated: March 19, 2024 22:47 IST

Nagpur News: रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सध्या अटकेत असलेले हे तिघेही चोरटे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सध्या अटकेत असलेले हे तिघेही चोरटे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

आदर्श मिलींद अंबादे (वय २१, रा. नंगपुरा, जि. गोंदिया) हा सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हावडा एक्सप्रेसच्या प्रवेशद्वारावर संशयास्पद अवस्थेत उभा होता. फलाट क्रमांक ६ वर तैनात असलेले आरपीएफचे पीएसआय एच. एल. मिना तसेच कर्मचारी कपिल झरबडे, नीरज कुमार, चंदन निर्मल, धिरज दलाल आणि दीपा कैथवास तसेच जीआरपीचे प्रवीण खवसे आणि अमोल हिंगणे आणि सतीश बुरडे यांना त्याचा संशय आला. त्यामुळे गाडी फलाटावर थांबताच आरपीएफच्या जवानांनी त्याला खाली उतरवून विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या ताब्यात येताच आरोपीची भंबेरी उडाली. त्याने पोलिसांच्या प्रश्नांवर उत्तर देताना काही वेळेपूर्वी एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तो पोलिसांच्या हवाली केला. त्याचे दोन साथीदार आणखी रेल्वे स्थानक परिसरात सावज शोधत असल्याची माहितीही मिळाली. त्यावरून आरपीएफच्या पथकाने प्रणय कालूदास ठवरे (वय २१) आणि मयूर उमेश उपाध्याय (वय २२, दोघेही रा. नंगपुरा, गोंदिया) यांनाही पकडले. हे दोघे प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या तयारीत होते. या तिघांनाही प्राथमिक चाैकशीनंतर आरपीएफने सोमवारी रात्री रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हवाली केले. गावातून निघायचे अन् दुसरीकडे हात मारायचाउपरोक्त चोरटे टापटीप होऊन घरून (गोंदियातून) निघतात. धावत्या रेल्वेत किंवा नागपूर स्थानकावर येऊन ते हात मारायचे अन् साळसुदपणे आपल्या गावाकडे परत जायचे. अशा प्रकारे त्यांनी आणखी कोणते गुन्हे केले, त्याचा जीआरपी तपास करत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी