नागपुरात रायफल, ३० काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:18 PM2018-07-20T22:18:12+5:302018-07-20T22:21:26+5:30

लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एका इंडिका कारला अडवून तीन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून एक रायफल आणि ३० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

In Nagpur rifle, 30 cartridges seized | नागपुरात रायफल, ३० काडतुसे जप्त

नागपुरात रायफल, ३० काडतुसे जप्त

Next
ठळक मुद्देतीन आरोपी गजाआड : लकडगंज पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एका इंडिका कारला अडवून तीन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून एक रायफल आणि ३० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
एमएच ३१/ सीएम ३१५१ क्रमांकाच्या इंडिका कारमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र घेऊन काही आरोपी सेंट्रल एव्हेन्यूकडे जात असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच धावपळ करून सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान प्रजापती चौकाजवळ कार अडवली. त्यात अभिजित सोमनाथ पांडे (वय २९), जगदीश काशीप्रसाद पांडे (वय १९, दोघेही रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, वाठोडा) आणि शाहदाब ऊर्फ नाझिर समशेर खान (वय २०,रा . कळमना)हे तीन गुन्हेगार बसून होते. पोलिसांनी त्यांना कारबाहेर बोलवून कारची झडती घेतली असता त्यात एक रायफल आणि ३० काडतूसं पोलिसांना मिळाली. त्यामुळे कारसह आरोपींना लकडगंज ठाण्यात आणले. या रायफलची बनावट लक्षात आली नाही. रायफलची बनावट विदेशीसारखी दिसत असल्याने शहरात लकडगंज पोलिसांनी एके ४७ पकडल्याची अफवा पसरली. परिणामी सर्वत्र खळबळ उडाली.
दरम्यान, ठाणेदार संतोष खांडेकर यांच्याकडून माहिती कळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, एसीपी वालचंद मुंडे लकडगंज ठाण्यात पोहचले. त्यांनी शस्त्र विशेषज्ञांनाही पाचारण केले. रायफलची पाहणी केल्यानंतर ती पॉइंट ३१५ बोल्ट अ‍ॅक्शन स्पोर्ट रायफल असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरील मजकूर बघता ती इंडियन आॅर्डनन्स फॅक्टरीत बनविण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

कशासाठी, कठे जात होते ?
आरोपी अभिजित हा या टोळीचा सूत्रधार असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्याचे वडील चौकीदारी करतात. आपण एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशात मूळगावी गेलो होतो. तेथे १० हजारांत ही रायफल आणि काडतूस विकत घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घरच्या मंडळींनी विरोध केल्याने कारमध्ये रायफल आणि काडतूस ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, त्याच्या कथनावर पोलिसांचा विश्वास नाही. मोठ्या प्रमाणात काडतूस आणि रायफल घेऊन आरोपी नेमके कुठे आणि कशासाठी जात होते, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. 

Web Title: In Nagpur rifle, 30 cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.