शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

Nagpur: सेवानिवृत्त जवानाचा सख्ख्या मुलावरच गोळीबार, थोडक्यात वाचला जीव, अजनीत खळबळ

By योगेश पांडे | Updated: July 9, 2024 20:50 IST

Nagpur News: सीआरपीएफच्या सेवानिवृत्त जवानाने क्षणिक संतापातून सख्ख्या मुलावरच गोळीबार केला. यात मुलगा जखमी झाला असून थोडक्यात त्याचा जीव वाचला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

- योगेश पांडे  नागपूर - सीआरपीएफच्या सेवानिवृत्त जवानाने क्षणिक संतापातून सख्ख्या मुलावरच गोळीबार केला. यात मुलगा जखमी झाला असून थोडक्यात त्याचा जीव वाचला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

माणिक पुंडलिक इंगळे (६८, ओमसाईनगर) असे आरोपीचे नाव आहे. तर मुलगा नितीन इंगळे (३२) हा जखमी झाला आहे. माणिक सैन्यदलातून सीआरपीएफमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर नागपुरातच वास्तव्याला आहे. त्यानंतर एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. माणिककडे परवाना असलेली बोअर १२ ची रायफल आहे. नितीनला एक मुलगा आहे. मुलाला शिस्त लागावी यासाठी नितीन त्याला रागवायचा व वेळप्रसंगी हातदेखील उचलायचा. यामुळे माणिकराव व नितीनचे वाद होत होते. नितीन सध्या बेरोजगार आहे. माणिकचा नातवावर फारच जीव असल्याने त्याचा शाळेचा खर्च उचलला होता. सोमवारी रात्री कामावरून घरी आल्यावर नातू माणिकजवळ गेला. त्यावेळी नितीनने माणिकला उद्देशून चौकीदार आला असे म्हटले. यावरून माणिक व नितीनमध्ये वाद पेटला. संतापाच्या भरात माणिकने १२ बोअरची रायफल आणली. नितीनने हिंमत असेल तर गोळी चालवूनच दाखव असे म्हटल्याने माणिकच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यातूनच गोळी झाडण्यात आली. गोळी नितीनच्या पायाला लागली. या आवाजामुळे खळबळ उडाली. नितीनच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व रक्तबंबाळ नितीनला मेडिकल इस्पितळात नेले. पोलिसांनी माणिकविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

क्षणिक वादातून टोकाचे पाऊलमाणिक व नितीन यांच्या अगोदरदेखील वाद झाले होते. दोघेही एकमेकांबाबत वाट्टेल तसे बोलायचे. नितीन लहान मुलाला मारायचा हे माणिकला पटत नव्हते. मात्र कुठलाही वाद इतका विकोपाला गेला नव्हता. सोमवारी माणिक दारूच्या नशेत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्याने मुलावर थेट गोळी चालविताना नातवाचा विचार केला नाही का असा सवाल नातेवाईक व शेजारी उपस्थित करत आहेत. ही गोळी मुलाच्या छातीत लागली असती किंवा त्याची पत्नी व नातवाला लागली असती तर अघटित घडले असते.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी