नागपूरकरांची पाण्याची चिंताच मिटली, तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 10:11 PM2021-09-13T22:11:57+5:302021-09-13T22:14:01+5:30

Nagpur News नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व कामठी खैरी या धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Nagpur residents' water worries are over, Totladoh's water reserves exceed 80 percent | नागपूरकरांची पाण्याची चिंताच मिटली, तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्के पार

नागपूरकरांची पाण्याची चिंताच मिटली, तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्के पार

Next
ठळक मुद्देचार दिवसांत आठ टक्क्यांची वाढखैरीतील पाणी पातळीतदेखील वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत सप्टेंबर महिन्यात वरुणराजाने कृपा केल्याचे चित्र असून धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व कामठी खैरी या धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवणार नाही. (Nagpur residents' water worries are over, Totladoh's water reserves exceed 80 percent)

 

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तोतलाडोह व कामठी खैरीतील जलसाठा ७२.०२ व ५९.५७ टक्क्यांवर पोहोचला होता. चारच दिवसात यात वाढ झाली व सोमवारी ही टक्कवारी अनुक्रमे ८०.११ व ६६.५६ टक्के इतकी झाली. तोतलाडोहच्या पाणीसाठ्यात चारच दिवसांमध्ये आठ टक्क्यांची भर पडली. तोतलाडोहची क्षमता १,०१६.८८ दलघमि इतकी असून आतापर्यंत ८१४.६७ पाणीसाठा जमला आहे. मागील वर्षी यात तारखेला तोतलाडोहमध्ये ९४.६६ टक्के पाणीसाठा होता.

पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता

मध्यप्रदेशात पेंच नदीवर बनविण्यात आलेल्या चौराई धरणाचा पाणीसाठा ८२.१८ टक्के इतका झाला आहे. तेथे आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तोतलाडोहमधील पाणीसाठ्यात देखील वाढ होईल.

नागपूर जिल्ह्यातील जलसाठा

मोठे प्रकल्प : टक्केवारी

तोतलाडोह : ८०.११

कामठी खैरी : ६६.५६

खिंडसी : ४९.६०

लोअर नांद : ७२.००

वडगाव : ९०.३२

Web Title: Nagpur residents' water worries are over, Totladoh's water reserves exceed 80 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी