नागपूरच्या रहिवाशाचा दुबईत कोरोनाने मृत्यू ; सेल्फीवरच झाले शेवटचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 07:00 IST2020-05-11T07:00:00+5:302020-05-11T07:00:18+5:30

नागपूर शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा दुबईमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांची पत्नी, मुलगी व नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही.

Nagpur resident died by corona in Dubai; The last appearance was on a selfie | नागपूरच्या रहिवाशाचा दुबईत कोरोनाने मृत्यू ; सेल्फीवरच झाले शेवटचे दर्शन

नागपूरच्या रहिवाशाचा दुबईत कोरोनाने मृत्यू ; सेल्फीवरच झाले शेवटचे दर्शन

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पत्नी, मुलगी अंत्यदर्शनापासून वंचित

योगेंद्र शंभरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा दुबईमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांची पत्नी, मुलगी व नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही.
या व्यक्तीचा दुबईच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. व्हेंटिलेटरवर असताना त्याने मोबाईलने सेल्फी घेतली आणि दुसºयाच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. मृत कोरोनाचा रुग्ण असल्याने त्यांचे पार्थिव दुबई प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले. नागपुरात राहणाºया त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती फोनवरच मिळाल्यानंतर त्यांची पत्नी, लहान मुलगी व अन्य कुटुंबीय दु:खात बुडाले आहे. दोन्ही देशात लॉकडाऊन असल्याने पत्नी आपल्या पतीचे व मुलगी आपल्या पित्याचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकली नाही. दरम्यान मृताचा मोबाईल फोन हॉस्पिटल प्रशासनाने दुबई येथे निवासास असलेल्या त्याच्या भावाकडे सोपविला आहे. त्या मोबाईलमध्ये मृताने व्हेंटिलेटरवर घेतलेली सेल्फी होती. त्यांनी ही सेल्फी नागपुरातील मृताच्या मुलीच्या मोबाईलवर पाठविली. याच सेल्फीच्या आधारे पत्नीने आपल्या पतीचे अंतिम दर्शन घेतले.

 

Web Title: Nagpur resident died by corona in Dubai; The last appearance was on a selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.