शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Rain : नागपुरात ढगफुटी, महापूर; रस्त्यांवर तरंगली वाहने, महिलेचा मृत्यू

By कमलेश वानखेडे | Updated: September 23, 2023 13:49 IST

४ तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस : नागनदी, पिवळीनदीचे पाणी वस्त्यांत शिरले

नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात पूर परिस्थती निर्माण झाली. चार तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळल्याने ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली. अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नागनदी, पिवळी नदीला पूर आला. पुराचे पाणी सखल भागांतील झोपडपट्टींसह पॉश वस्त्यांमध्येही शिरले. नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. महेश नगर येथील मिराबाई पिल्ले (वय ७०) या महिलेचा मृत्यू झाला.

अंबाझरी परिसरातील डागा ले-आऊईटमध्ये घरांमध्ये चार फुटांवर पाणी गेल्याने येथील नागरिकांना बचाव पथकाने बोटीने बाहेर काढले. फ्लॅट स्कीममध्ये, रस्त्यांवर पार्क केलेल्या कार पाण्यावर तरंगताना दिसल्या. मोरभवनमध्ये पाणी साचल्याने आपली बसचे प्रवासी अडकले. रेल्वे स्टेशनमध्येही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारी १२ पर्यंत शहरातील बहुंतांश मार्गांवरील वाहतूक बंद होती.

नंदनवन झोपडपट्टीत नागनदीचे पाणी शिरल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. या भागातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझ्ड झाली आहे. परिसरातील वस्त्यातही पाणी शिरले आहे. स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. लोकांच्या समस्या जाणून घेतली.नागनदीला पूर आल्याने नंदनवन झोपडपट्टीतील घरात घाण पाणी साचल्याने लोकांनी रात्र जागून काढली. घरातील पाणी बदल्यांनी बाहेर काढण्यात अनेकांची रात्री गेली.

सकाळी ८.३० पर्यंत ११६. ५ मिमी पाऊस

मध्यरात्री २ वाजतापासून सुरू झालेला पाऊस पहिल्या दोन तासांमध्ये ९० मिमी बरसला. तर हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार सकाळी ८.३० पर्यंत ११६.५ मिमी ची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे गोरेवाड्याचे २ गेट उघडण्यात आले. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

टॅग्स :floodपूरnagpurनागपूरRainपाऊस