शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 7:52 PM

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले.

ठळक मुद्देमनपा मुख्यालयात ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौरसंदीप जोशी यांनी रविवारी केले. सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालयात महापौर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रगती पाटील, रुपा राय, सुनील हिरणवार, भगवान मेंढे, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.जुन्या बसेस बायोसीएनजीवर करण्यात आल्या. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, ई-रिक्षा, सोलरवरील मेट्रो आदींचा उहापोह त्यांनी केला. स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध अभियानाचीही माहिती संदीप जोशी यांनी दिली. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान लोकशाही पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून, या काळात मतदार नोंदणी करा आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन केले.यावेळी स्वच्छतादूत म्हणून सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे निवृत्त शाखा व्यवस्थापक सुनील भागवत, स्वच्छताविषयक जनजागृती करणाºया तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्ष किरण मुंधडा, रस्ता सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मनपा आसीनगर झोनचे कनिष्ठ कर आकारणी निरीक्षक चंद्रशेखर मोहिते, अग्निशमन विभागाच्या सक्करदारा केंद्राचे ऐवजदार वाहनचालक शब्बीर शेख यांचा महापौरांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी महापौर व आयुक्त यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या अग्निशमन विभागाच्या परेडची मानवंदना स्वीकारली. संचालन एनएसएसडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी तर आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त राजेश मोहिते, निर्भय जैन, डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूरMayorमहापौरSandip Joshiसंदीप जोशीRepublic Dayप्रजासत्ताक दिन