शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:14 AM

काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसफाई कर्मचारीच जाळतात कचरा१६ महिन्यात केवळ ४४ कारवाई

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. सकाळी ऊर्जा देणाऱ्या प्राणवायुला धुराच्या दुर्गंधीचा विळखा पडत आहे. हे चित्र शहरातील प्रत्येक भागातील आहे. यावर निर्बंध लावण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु त्यांचेच कर्मचारी यात आघाडीवर असल्याने प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर कचरा जाळण्याला घेऊन महानगरपालिका कधीच गंभीर राहिलेली नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर काही दिवस कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाली. तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी कचरा जाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कारवाईची ही मोहीम जोरात सुरू होती. त्यानंतर स्वच्छता दूत म्हणून माजी सैनिकांवर या कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कचरा जाळणे कमी झाले होते. परंतु स्वच्छता दूतवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविताच कारवाईची मोहीम थंडबस्त्यात गेली. परिणामी, मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात सकाळी धुराचे लोट उठणे सुरू झाले. विशेष म्हणजे, ११ डिसेंबर २०१७ पासून ते २३ मार्च २०१९ दरम्यान स्वच्छता दूतांनी केवळ ४४ प्रकरणांमध्ये ८७०० रुपये दंड वसूल केला आहे. प्रति कारवाई २०० रुपये दंड लावला आहे.

हवा होत आहे विषारीसूर्याेदयावेळी हवेमध्ये ऑक्सिजनची मात्रा सर्वाधिक असते. मोठ्या संख्येत लोक वॉकिंग, जॉगिंगला जातात. परंतु याचवेळी कर्मचारी व नागरिक कचरा जाळतात. हवेतील ऑक्सिजनमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मानोऑक्साईड मिसळून हवा विषारी होते. हवेमध्ये सूक्ष्म कण (पार्टिकुलेट मॅटर) मिसळतात. यामुळे कॅन्सर, दमा, श्वसन संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

भंगार व्यवसायिकही जाळतात सर्रास कचराकाही भंगार व्यवसायिक व नागरिक पैशाच्या हव्यासापोटी विद्युत तारेमधील तांबे मिळविण्यासाठी, टायरमधील लोखंड मिळविण्यासाठी सर्रास या वस्तू जाळतात. परंतु यांच्यावर कधीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.चार झोनमध्ये एकही प्रकरण नाहीलक्ष्मीनगर, हनुमाननगर, गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये कचरा जाळल्याचे एकही प्रकरण सामोर आले नाही. जेव्हा की या परिसरात कचरा जाळताना मनपाचे कर्मचारी रोज सकाळी दिसून येतात. कचरा जाळण्यात आल्याचे पुरावेही अधिकाऱ्यांना दिसतात. मात्र दुर्लक्ष केले जाते.

टॅग्स :pollutionप्रदूषण