शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गणेश विसर्जनासाठी नागपूर पोलिसांनी कसली कंबर : ड्रोनने ठेवणार फुटाळा तलावावर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 9:10 PM

गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्हीचे सर्वत्र जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय फुटाळा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी ९७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त चिन्मय पंडित, विनिता साहू यांनी दिली.

शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्तींचे फुटाळा तलावावर विसर्जन करण्यात येणार आहे. यामुळे फुटाळा तलावाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. फुटाळा तलावावर ११ सप्टेंबरला ११, १२ सप्टेबरला ४०९, १३ सप्टेबरला २४० आणि १४ सप्टेबरला ३२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. फुटाळा तलावाच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यासाठी चार ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. गरज भासल्यास त्यांचा इतर ठिकाणीही वापर करण्यात येईल. 
स्मार्ट सिटीनुसार लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याशिवाय ९७ अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बहुतांश कॅमेरे फुटाळा तलावावर लावण्यात आले आहेत. वॉच टॉवरसोबत फ्लड लाईटही लावण्यात आले आहेत. फुटाळावर महिला मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे छेडखानीच्या घटनांची शक्यता पाहून १२ विशेष दल तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक ठाण्याला याबाबत विशेष दल तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था तेलंगखेडी मार्गावर तलावाच्या किनाऱ्यावर केली आहे. येथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. येथे नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जमिनीचा वाहनांच्या पार्किंगसाठी वापर करण्यात येईल. तेलंखेडी शिव मंदिराकडून सीपी क्लबकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहने उभी करण्यात येतील. तेलंखेडी हनुमान मंदिराच्या समोरून कोणत्याही वाहनास फुटाळाकडे जाऊ देण्यात येणार नाही. वाहतुक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले की, अमरावतीकडून येणाऱ्या आणि शहरातून अमरावतीला जाणारे वाहन चालक एमआयडीसी टी पॉईंटवरुन आवागमन करू शकतात. अमरावती मार्गावर विसर्जनाच्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शंका राहते. या मार्गाचा वापर टाळल्यास इतर वाहन चालकांना त्रास होणार नाही. विसर्जन तलावांवर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ दलाला तैनात करण्यात आले आहे.डीजे-फटाक्यांवर होणार कारवाईपोलीस डीजे वाजविणारे आणि फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार आहेत. विसर्जनाच्या वेळी पारंपरिक वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.१२ सप्टेबरला मध्यरात्रीपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन स्थळावर फटाक्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी सर्व ठाण्यांना उपकरणे देण्यात आली आहेत.मद्यपी चालकांवर नजरपोलिसांच्यावतीने मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष दल तैनात केले आहेत. गुरुवारी ड्राय डे आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत वाहनचालक नशेत असल्यामुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २१७ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीFutala Lakeफुटाळा तलावPoliceपोलिस