शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

किन्नरांच्या संघर्षात नागपूर पोलिसांनी केली दिलजमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:43 AM

मध्य भारतातील तृतीयपंथीयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नागपुरातील तृतीयपंथीयांचा वाद सोडविण्यात पोलिसांनी अखेर यश मिळवले.

ठळक मुद्देरक्तरंजित गटबाजीला मूठमातीअधिकाऱ्यांनी घडविले मनोमिलन

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजाच्या तिरस्काराचे ओझे घेऊन जगणारे किन्नर (तृतीयपंथी) शहराच्या हिस्सेवाटणीसाठी ‘त्यांच्याच पंथा’तील मंडळीचे शत्रू बनले. वाद वाढतच गेला अन् रोजच टिंगल टवाळीला सामोरे जाऊन जगण्यामरण्याचा संघर्ष करणारी ही मंडळी स्वपंथीयांच्या जीवावर उठली. कुणी चाकू तर कुणी ब्लेड जवळ ठेवून स्वकीयांमधील प्रतिस्पर्ध्याला धडा शिकविण्याच्या तयारीने बाहेर निघू लागली. त्यांच्यातील संघर्ष एवढा टोकाला पोहचला की एका गटप्रमुखाने चक्क पिस्तूलच जवळ बाळगले. नुसते बाळगले नाही तर फायरही केला. त्यांच्यातील स्फोटक वाद पोलिसांसाठीही डोकेदुखीचा विषय होता. तो कसा सोडवावा, हेच कळत नव्हते. मात्र, अखेर पोलिसांनी त्यावर उतारा काढला. दोन-तीनही गट समोरासमोर बसविले. त्यांचे समुपदेशन केले. संघर्षाच्या परिणामाची कल्पना दिली अन् अखेर ते एक झाले. होय, मध्य भारतातील तृतीयपंथीयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नागपुरातील तृतीयपंथीयांचा वाद सोडविण्यात पोलिसांनी अखेर यश मिळवले.देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात समुद्र सोडून सगळेच आहे, असे म्हटले जाते. येथील विविध वैशिष्ट्यांचा पदर धरून वेगवेगळ्या जात-धर्म-पंथांची मंडळी येथे गोडीगुलाबीने राहतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. नागपुरातील तृतीयपंथीय मात्र त्याला अपवाद होते. ते एकमेकांच्या जीवावरच उठले होते. उपराजधानीत अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांचे वास्तव्य आहे. येथे राहत असलेल्या तृतीयपंथीयात नागपूर, चंद्रपूर, अमरावती, हैदराबाद, रायपूर, भोपाळ आणि दिल्लीसह अन्य प्रदेशातील किन्नरांचा समावेश आहे. ते वेगवेगळ्या गटात राहतात. उपराजधानीतील कोणत्या भागात कुणी फेरी मागायची (रक्कम गोळा करायची), कोणत्या शुभकार्यात कोण बधाई (शुभेच्छा) देणार आणि कोण रक्कम घेणार, दसरा-दिवाळीसह अन्य सणोत्सवात कोण आणि कुणी बोजारा घ्यायला जाणार, या मुद्यावरून त्यांच्यात चार वर्षांपूर्वी कुरबूर सुरू झाली. ती वाढतच गेली. ती एवढी वाढली की त्यांच्यात हाणामाऱ्या सुरू झाल्या. त्यामुळे एका गटाच्या प्रमुखाने आपला गाशा गुंडाळत नागपूर सोडले. त्यानंतर उत्तम सपन सेनापती, चमचम, मोहिनी नायक आणि मीना नायक या चार गटांचे नेतृत्व करू लागले (लागल्या!) त्यांच्यातील वाद अधिकच टोकदार झाला. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी भांडताना ते चाकू, सुरा, ब्लेड, दगड, काठ्या घेऊन एकमेकांना रक्तबंबाळ करू लागले. पोलिसांत तक्रारी होऊ लागल्या. गुन्हेही दाखल झाले. प्रत्येक गुन्ह्यानंतर गटागटातील वैमनस्य तीव्र झाले.गेल्या आठवड्यात त्यांनी भरदुपारी वर्धमाननगरसारख्या अत्यंत वर्दळीच्या भागात एकमेकांवर जोरदार हल्ला चढवून जबर जखमी केले. यापूर्वीही नंदनवन, तहसील, पाचपावली, जरीपटका आणि लकडगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल झाले. दोन्ही गट एकमेकांवर बोगस (बनावट तृतीयपंथी) असल्याचा आरोप करीत होते. कारण त्यांना शहरातील सर्वाधिक व्यापारी प्रतिष्ठाने असलेला परिसर फेरीसाठी (रक्कम मिळवण्यासाठी) हवा होता. त्यांचा वाद केवळ नागपूरच नव्हे तर मध्य भारतातील तृतीयपंथीयांसाठीही चर्चा आणि चिंतेचा विषय ठरला होता. तो लक्षात घेत पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर यांनी हा वाद निकाली काढण्याचा संकल्प केला. त्यानुसार, आधी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर दोन्ही गटाचे अनुक्रमे उत्तम सेनापती आणि चमचम तसेच मोहिनी आणि मीना यांना त्यांच्या समर्थकांसह वेगवेगळे बोलवले. त्यांना या वादाच्या दुष्परिणामाची कल्पना दिली. त्यांचे समुपदेशन केले. दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखविले. त्यानंतर त्यांची शुक्रवारी २ जानेवारीला एकत्र बैठक घेतली अन् त्यांच्यात समेट घडवून आणला.

छोडो भी गुस्सा...काही वेळेपूर्वी एकमेकांकडे द्वेषपूर्ण भावनेने बघून शिव्या हासडणारे दोन्ही गट प्रमुख ‘छोडो भी गुस्सा...’ म्हणत एकमेकांच्या गळ्यात पडले. तत्पूर्वी एका स्टॅम्प पेपरवर त्यांनी आपसी समेटपत्र पोलिसांना लिहून दिले. आपण आता गुण्यागोविंदाने राहू, असा संकल्प दोन्ही गटप्रमुख तसेच त्यांच्या समुदायातील शेकडो समर्थकांनी केला. पोलिसांच्या सामाजिक भूमिकेमुळे हे शक्य झाले.

नंदनवनमधील विवस्त्र गोंधळहिंसक संघर्षानंतर पोलीस कारवाईमुळे तृतीयपंथीयांच्या चार गटाचे दोन गट झाले. उत्तम सेनापती आणि चमचमचा एक तर मोहिनी आणि मीनाचा दुसरा गट पाचपावली तसेच हंसापुरीके नायक नावाने ओळखला जाऊ लागला. गट दोन झाले त्यामुळे वादही तीव्र झाला. गेल्या वर्षी अशाच प्रकारे त्यांच्यात वाद झाल्यानंतर उत्तम सेनापती चक्क पिस्तूल घेऊनच निघाले. दुसऱ्या गटाने नंदनवन पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावरचे कपडे फेकून विवस्त्र गोंधळ घातला. त्यावेळी ते एवढे आक्रमक झाले होते की ठाण्यातून पोलिसांना चक्क पळ काढावा लागला होता.

 

टॅग्स :Policeपोलिस