शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करी करणारा नागपुरातील पोलीस शिपाई सचिन हांडे बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:19 IST

दारूची तस्करी करताना नऊ दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पकडला गेलेला शहर वाहतूक शाखेचा पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे (वय ३३, ब.नं. ६६५९) याला आज पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या पोलिसांना या कारवाईमुळे खणखणीत इशारा मिळाला आहे. हांडे याला कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता पोलीस दलातून काढून टाकण्यासारखी कठोर कारवाई झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोलीस दलात खळबळ : कठोर कारवाईतून पोलीस आयुक्तांचा खणखणीत इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूची तस्करी करताना नऊ दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पकडला गेलेला शहर वाहतूक शाखेचा पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे (वय ३३, ब.नं. ६६५९) याला आज पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या पोलिसांना या कारवाईमुळे खणखणीत इशारा मिळाला आहे. हांडे याला कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता पोलीस दलातून काढून टाकण्यासारखी कठोर कारवाई झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

मूळचा भद्रावतीचा रहिवासी असलेला सचिन विनायक हांडे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत होता. एका मोठ्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असलेल्या प्रणव हेमंत म्हैसकर(वय २३)सोबत तो दारूची तस्करी करत होता. चंद्रपूर जिल्ह्यात सरकारने दारूबंदी केल्यानंतर या जिल्ह्यात नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. आरोपी सचिन हांडे आणि प्रणव म्हैसकर रविवारी, ९ जूनला पहाटे देशी-विदेशी दारूने भरलेली कार (एमएच ३१ ईयू ४८७३) घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात चालले होते. ही माहिती वरोरा पोलिसांना कळताच ठाणेदार उमेश पाटील,सहायक पोलीस निरीक्षक अमोल मांडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नंदोरी टोलनाक्याजवळ नाकाबंदी केली. सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान नमूद कार टोलनाक्याजवळ पोहचली. समोर सचिन हांडे पोलीस गणवेशात बसून होता. त्याने कारमध्ये काहीच नसल्याचे सांगून वरोरा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खबºयाने पक्की टीप दिल्यामुळे पोलिसांनी हांडेला कारची डिक्की उघडण्यास भाग पाडले. डिक्कीत दारूचे आठ खोके आढळले. पोलिसांनी ही दारू तसेच आरोपींच्या ताब्यातील एसक्रॉस कार जप्त केली आणि दारू तस्करी करणाºया हांडे तसेच म्हैसकरला अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआरही घेतला होता. चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी ही माहिती नागपूर पोलिसांना कळविली. पोलीस दलाच्या प्रतिमेला काळे फासण्याचा हा प्रकार शहरात खळबळ उडवून देणारा ठरला होता.पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे धाडस यापुढे पुन्हा कुणी करू नये म्हणून काय करावे, यावर गंभीर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गुन्हेगारांशी तसेच अवैध धंदेवाल्यांसोबत मैत्री ठेवणारा पोलीस रंगेहात सापडल्यास त्याला कोणतीही संधी न देता थेट सेवेतूनच काढून टाकण्याचा (बडतर्फीचा) निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सचिन हांडेवर बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी मंगळवारी तसा आदेश जारी केला.या कारवाईचे वृत्त पोलीस दलात वायुवेगाने पसरले आणि सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली. अनेक पोलिसांनी आपापल्या मोबाईलमधून गुन्हेगारांचे नाव आणि संपर्क नंबरच डिलिट करून टाकले. दोन महिन्यांपूर्वी मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या कुख्यात अबूसोबत मैत्री ठेवणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकांसह सहा जणांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, ती कारवाई मवाळ स्वरूपाची असल्याची ओरड झाली होती. त्याचमुळे की काय अनेक पोलीस अजूनही अवैध धंदे करणारे आणि अनेक कुख्यात गुन्हेगारांशी मैत्री ठेवून आहेत. ते पोलीस दलाची नोकरी करीत असले तरी सेवा मात्र गुन्हेगारांना देतात. कारवाई होऊ नये म्हणून त्यांना वेळीच सतर्क करतात. मद्याची खेप इकडून तिकडे पोहचवण्यासाठी स्वत:च गणवेष घालून वाहनात बसतात. गणवेषातील पोलीस दिसल्यामुळे सहसा दुसरे पोलीस कारवाई करीत नाही. त्याचा ते गैरफायदा घेत महिन्याला हजारो रुपये मिळवतात. पोलीस दलाच्या प्रतिमेला काळे फासणाऱ्याची यापुढे गय केली जाणार नाही, असा खणखणीत इशाराच आजच्या कारवाईतून संबंधितांना देण्यात आला आहे.गुन्हेगार समजूनच कारवाई : पोलीस आयुक्तअवैध धंदे रोखण्याची आणि गुन्हेगारीला आळा घालण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांचे ते आद्यकर्तव्य ठरते. मात्र, हे कर्तव्य विसरून कुणी अवैध धंदे करणारे, गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असेल तर अशा पोलिसांची कसलीही गय केली जाणार नाही. त्याला गुन्हेगार समजूनच यापुढे कारवाई करण्यात येईल. संबंधितांनी हे लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या कारवाईच्या संबंधाने लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयPoliceपोलिसnagpurनागपूर