पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2024 17:06 IST2024-06-22T17:06:50+5:302024-06-22T17:06:56+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी

Nagpur police arrested five accused who were gambling with money | पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : पैसे लावून जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने शुक्रवारी दुपारी ४.२० वाजताच्या सुमारास पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंगेहात अटक करून त्यांच्या ताब्यातून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विवेक सुरेंद्र गायकवाड (२९), शरद माधव मानवटकर (५०), सुरज कृपासागर मानवटकर (३२) तीघे रा. अशोकनगर बेलसाठ, पारडी, भागवत वासुदेव वाघ (६०, रा. तरोडी बु.) आणि तुकाराम दयाराम पोटभरे (५४, रा. शारदा चौक पुनापूर, पारडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक गस्त घालत असताना त्यांना आरोपी पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत छायाबाई रंगारी अशोकनगर बेलसाठ यांच्या घरी जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी जुगार खेळताना आढळले. आरोपींच्या ताब्यातून ९ हजार ९८० रुपये रोख, ४ मोबाईल, ताशपत्ते व इतर साहित्य असा एकुण ५७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना पारडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Nagpur police arrested five accused who were gambling with money