नागपुरात जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:19 IST2018-03-29T01:18:58+5:302018-03-29T01:19:14+5:30

जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे.

 In Nagpur, poisoned the dog and the pig | नागपुरात जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारले

नागपुरात जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारले

ठळक मुद्देनागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे.
कळमना वस्तीतील नागरिकांना बुधवारी सकाळी चार श्वान आणि एका वराहाचा मृतदेह आढळून आला. त्यांना जेवणात विष देण्यात आल्याची बाब उघडकीस आली. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले या घटनेची माहिती होताच पशुप्रेमीही पोहोचले. त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
२५ मार्च रोजी सकाळी शांतिनगर वस्तीत रॉडने मारहाण करून श्वानाचा जीव घेण्याचा आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी शांतिनगर पोलिसांनी पशु क्रूरता अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत रतन ऊर्फ लालू चमके (२५) आणि नितीन सातपुते (२५) याला अटक केली आहे.

Web Title:  In Nagpur, poisoned the dog and the pig