शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

नागपुरात पेट्रोल @ ८०.४९, डिझेल ७०.४४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:29 IST

अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली.

ठळक मुद्देजूनमध्ये पेट्रोल ३.६९, डिझेल ३.७० रुपये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली. जूनमध्ये पेट्रोल ३.६९ आणि डिझेलमध्ये ३.७० रुपयांची वाढ झाली आहे. दोनदा सेस आणि दरदिवशी दर वाढवून राज्य शासन आणि पेट्रोलियम कंपन्या संकटाच्या काळात ग्राहकांच्या खिशातून पैसे काढत आहे. त्यामुळे ग्राहक संतप्त आहेत.केंद्र सरकारच्या आदेशानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी १६ मार्चपासून पेट्रोल अणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल ७५.८० आणि डिझेल ६५.७४ रुपये प्रति लिटर होते. १ एप्रिलला राज्य शासनाने पेट्रोल अणि डिझेलवर १ रुपये सेस वाढविला होता. त्यानंतर पेट्रोल ७६.८० आणि डिझेल ६६.७४ रुपयांवर गेले होते. ३१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवर पुन्हा २ रुपये सेस आकारला. त्यामुळे १ जूनपासून पंपावर पेट्रोल ७८.८० आणि डिझेल ६८.७४ रुपयांवर पोहोचले. आता पेट्रोलियम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भावानुसार ६ जूनच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ७ जूनला पेट्रोलमध्ये ५९ पैसे आणि डिझेलमध्ये ५८ पैशांची वाढ होऊन पेट्रोल व डिझेल अनुक्रमे ७९.३९ व डिझेल ६९.३२ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर ८ जूनला वाढ होऊन पेट्रोल ७९.९७ व डिझेल ६९.८९ रुपयांवर गेले. शिवाय ९ जूनला पेट्रोल ५२ पैसे आणि डिझेल ५५ पैशांनी वधारून पंपावर पेट्रोल प्रति लिटर ८०.४९ रुपये आणि डिझेल ७०.४४ रुपयांवर विक्री झाली.पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे महागाई वाढणार आहे. डिझेल महाग झाल्याने मालवाहतुकीचे दर वाढून पुन्हा भाजी, तेल, किराणा, धान्य आणि इतर वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनीही इंधनावर सेस वाढविला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये बदल दररोज होणार असल्याने इंधनाचे दर उच्चांक गाठतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

टॅग्स :Petrolपेट्रोलInflationमहागाईnagpurनागपूर