शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पवनकर हत्याकांड: मितालीचा अखेरचा आधारही हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 16:09 IST

नागपुरातील पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी ७ वर्षीय मितालीचा अखेरचा आधारही हरविला आहे.

ठळक मुद्देमाथेफिरू बापाच्या खुनशी वृत्तीचा परिणामनातेवाईकांच्या गराड्यात मिताली एकटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी ७ वर्षीय मितालीचा अखेरचा आधारही हरविला आहे. चार वर्षापूर्वी बापाने तिच्या आईची हत्या केली होती. त्यामुळे लहान भाऊ व मिताली मामाच्या आसऱ्याने नागपूरला राहत होते. मात्र रविवारच्या मध्यरात्री क्रूरकर्म्याने हा शेवटचा आधारही हिरावून घेतला. आज घटनेनंतर जमलेल्या नातेवाईकांच्या गराड्यात मिताली एकटी पडली होती.दिघोरी परिसरातील आराधनानगरात घडलेल्या पवनकर कुटुंबियांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. या हत्याकांडात दोन मुली केवळ बचावल्या आहेत. यातील एक मृतक कमलाकर पवनकर यांची मुलगी वैष्णवी तर दुसरी आरोपीची स्वत:ची मुलगी मिताली आहे. आरोपी हा कमलाकर पवनकर यांचा साळा होता. आरोपी विवेक याचा स्वभाव विक्षिप्त स्वभावाचा होता. त्याने कशाचाही विचार न करता २०१४ मध्ये पत्नीचाही खून करून दोन मुलांना उघड्यावर सोडले होते. आईचा मृत्यू आणि बाप कारागृहात त्यामुळे पोरके झालेल्या मिताली व तिचा भाऊ क्रिष्णा यांना कुणीही जवळ केले नाही. अशावेळी कमलाकर व अर्चना यांनी या मुलांना आधार दिला त्यांना माया लावली. या आधारावर दोघेही भावंड चांगले आयुष्य जगत होते. कृष्णा तर अर्चना व कमलाकर यांना आई-वडील म्हणत होता. कमलाकरने मुलांचे संगोपन तर केलेच, शिवाय विवेकाला कारागृहातून सोडवून आणण्यातही मदत केली. पण या राक्षसी प्रवृत्तीच्या विवेकला ना उपकाराची जाण होती, ना मुलांबद्दलही कुठलीच भावना.इतक्या निर्दयीपणे कुणी शत्रुलाही मारू नये, अशा विक्षिप्तपणाने त्याने स्वत:च्या बहिणीच्या कुटुंबाचा घात केला. यात त्याने स्वत:च्या पोरालाही संपविले. मिताली मात्र वैष्णवीसोबत वेगळी झोपली असल्याने त्याच्या क्रौर्यापासून बचावली. आधी आईपासून आणि आता मामाच्या आसऱ्यापासून मिताली पोरकी झाली.आयुष्यभर बापाच्या विक्षिप्तपणाचा ठपका राहिलघटनेनंतर नातेवाईक कमलाकर यांच्या घरी पोहचले. मिताली आणि वैष्णवी दोघाही सोबत होत्या. वैष्णवीला सगळ्यांनी जवळ घेतले. पण मिताली नातेवाईकांपासून काहीशी दूर बसली होती. आधार तर वैष्णवीचाही हरविला पण तिला नातेवाईकांची सहानुभूती लाभली. कदाचित कमलाकर यांच्या स्वभावामुळे वैष्णवीला नातेवाईकही जवळ करतील, पण मितालीचे काय? आयुष्यभर बापाच्या विक्षिप्तपणाचा ठपका तिच्या माथ्यावर राहिल.काय आहे पार्श्वभूमी?नागपुरात रविवारी मध्यरात्री नंदनवन भागात राहणाऱ्या कमलाकर पवनकर या भाजप कार्यकर्त्याच्या मेव्हण्याने कमलाकर, त्यांची पत्नी, आई मीराबाई, मुलगी वेदांती व आपला मुलगा कृष्णा या पाच जणांचा बत्त्याने प्रहार करून निर्घृण खून केला. या क्रौर्याने नागपूर शहारले असून आरोपी विवेकचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा