शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पेपरफुटी प्रकरण; निवृत्त उपप्राचार्याने केला 'गोपनीयतेचा भंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:00 IST

Nagpur : सन २०२३ ला कोल्हापूर, लातूर आणि उमरेड येथील तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांनी बारावी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला होता. सेट केलेला हा पेपर मार्च आणि ऑक्टोबर २०२३ या परीक्षेला आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : सन २०२३ ला कोल्हापूर, लातूर आणि उमरेड येथील तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांनी बारावी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला होता. सेट केलेला हा पेपर मार्च आणि ऑक्टोबर २०२३ या परीक्षेला आला नाही. मार्च आणि ऑक्टोबर २०२४ च्या दोन्ही परीक्षेतसुद्धा पेपरचे दर्शन झाले नाही. मार्च आणि ऑक्टोबर २०२५ या तिसऱ्या वर्षातही बोर्डाच्या परीक्षेत हा पेपर आला नव्हता. यामुळे आपण सेट केलेला रसायनशास्त्राचा पेपर मार्च २०२६ ला नक्कीच येणार, ही बाब एकदम क्लियर झाली होती. याच संधीचा लाभ पेपरसेटर सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. सतीश मुकुंद खर्चे आणि टार्गेटचा संचालक अतुल जगन चौधरी यांनी संगनमताने घेतला. या संपूर्ण प्रकरणात पेपरसेटर तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्च यांनी 'गोपनीयतेचा भंग' केल्याचीही बाब पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

उमरेड येथील बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ते नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. उमरेड पोलिसांनी नुकतेच कोल्हापूर येथील एका पेपरसेटरचे बयाण नोंदविले. या संपूर्ण प्रकरणात अन्य कुणाकडेही शंकेच्या नजरेने बघितल्या गेले नाही, ही बाब आता स्पष्टपणे दिसून येत आहे. उमरेड येथील टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स कोचिंग क्लासमध्ये ७० ते ७५ बारावीच्या विद्यार्थ्यांची नियमित बेंच होती.

संचालक अतुल चौधरी यांनी आतापर्यंत रसायनशास्त्र या विषयाची तीनवेळा सराव परीक्षासुद्धा घेतली होती. चौथी सराव परीक्षा २५ जानेवारी २०२६ ला झाली. यादरम्यान याच पेपरची तयारी चांगली करा, अशाही सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी १८ फेब्रुवारीला बोर्डाचा पेपर सोडविला. टार्गेट कोचिंग क्लास आणि बोर्डाच्या पेपरमध्ये काही सूक्ष्म बदल वगळता उर्वरित प्रश्न तंतोतंत निघाले. व्हिडीओ व्हायरल झाला. पेपरफुटीची बातमी फुटली. उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तीन सेट काढले

सन २०२३ ला नाशिक येथे रसायनशास्त्र विषयाचा पेपर काढण्यात आला होता. तीन पेपरसेटरने या विषयाचे तीन सेट काढले. एकूण सात दिवसांच्या मुक्कामादरम्यान आरोपी सतीश खर्चे यांनी गोपनीयतेचा भंग केला.

पोलिसांची दमदार कामगिरी

उमरेडच्या पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडविली होती. नागपूर येथील प्रकरण या प्रकरणापेक्षा वेगळेच होते. अशा बहुचर्चित, क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. योग्य तपासाची दिशा ठरविली आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Paper Leak: Retired Professor Breached Confidentiality, Investigation Reveals

Web Summary : A retired professor leaked a chemistry paper set in 2023, intending it for the 2026 exams. He colluded with a coaching center director, resulting in a police investigation and arrests. The leak caused widespread outrage, with police praised for solving the complex case.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण