नागपुरात कुख्यात आरोपीस देशी कट्ट्यासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 20:41 IST2018-10-03T20:40:13+5:302018-10-03T20:41:18+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज नरेश कुत्तरमारे याला देशी कट्ट्यासह पकडले. सूरज चंद्रमणीनगरात राहतो. त्याच्याविरुद्ध खुनासह १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसापासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय आहे. अजनी पोलीस ठाणे परिसरात लोकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून केल्यानंतर तो अजनी परिसरातून फरार झाला होता.

नागपुरात कुख्यात आरोपीस देशी कट्ट्यासह अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज नरेश कुत्तरमारे याला देशी कट्ट्यासह पकडले. सूरज चंद्रमणीनगरात राहतो. त्याच्याविरुद्ध खुनासह १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसापासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय आहे. अजनी पोलीस ठाणे परिसरात लोकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून केल्यानंतर तो अजनी परिसरातून फरार झाला होता.
गुरुवारी रात्री गुन्हे शाखा पोलिसांना तो कामठी स्टेशनजवळ संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा सापडला. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने अनेक शत्रू असल्याने देशी कट्टा सोबत ठेवल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, एपीआई विक्रांत सगणे, पीएसआई आशीष चेचरे, सुनील राउत, कर्मचारी राजेश यादव, प्रशांत लांडे, अजय बघेल, नामदेव टेकाम, अरूण चांदणे, रवि साहू, नरेंद्र ठाकूर, प्रीतम ठाकूर, उत्कर्ष राऊत आणि नावेद शेख यांनी केली.