नागपूर मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:26 IST2018-12-06T23:23:59+5:302018-12-06T23:26:14+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदींनी गुरुवारी सकाळी संविधान चौक (रिझर्व्ह बँक) चौक येथील प्रतिमेला नगरीतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

नागपूर मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदींनी गुरुवारी सकाळी संविधान चौक (रिझर्व्ह बँक) चौक येथील प्रतिमेला नगरीतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन के ले.
यावेळी विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम, संदीप गवई, सुनील हिरणवार, अपर आयुक्त अझीझ शेख, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहा. आयुक्त अशोक पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यानंतर केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला नंदा जिचकार यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यकारी अभियंता .गिरीश वासनिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी, सहा.विधी अधिकारी अजय माटे, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, दिलीप तांदळे, राजेश वासनिक, विशाल शेवारे, संजय बागडे, प्रेमदास शेवारे, चंद्रमणी रामटेककर, दीपक जांभुळकर, शिलवान ढोरे, भगवान खोब्रागडे, अंकुश खापर्डे, विलास धुर्वे, डोमाजी भडंग आदी उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या दालनातील तैलचित्राला अभिवादन करण्यात आले.