नागपूर मनपा कंत्राटदारांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:23 IST2018-07-10T00:21:25+5:302018-07-10T00:23:34+5:30

मार्च महिन्यापासून प्रलंबित असलेले बिल मिळावे, यासाठी महापालिकेच्या कंत्राटदारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करू न महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व आयुक्त वीरेंद्र सिंह यांना निवेदन दिले. बिल न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला.

Nagpur NMC contractor demonstrated | नागपूर मनपा कंत्राटदारांची घोषणाबाजी

नागपूर मनपा कंत्राटदारांची घोषणाबाजी

ठळक मुद्देकाम बंद करण्याचा इशारा : प्रलंबित बिलासाठी महापौरांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्यापासून प्रलंबित असलेले बिल मिळावे, यासाठी महापालिकेच्या कंत्राटदारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करू न महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व आयुक्त वीरेंद्र सिंह यांना निवेदन दिले. बिल न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला.
मनापा कंत्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आपली व्यथा मांडली. नगरसेवक कामासाठी दबाव आणतात तर जुनी देणी बाकी असल्याने साहित्याचा पुरवठा करणारे बिलासाठी त्रस्त करतात. यामुळे कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. आर्थिक अडचणीमुळे कंत्राटदार आपल्या मुलांचे शुल्क भरू शकत नाही. उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी भटकंती करावी लागते. जीएसटी लागू झाल्यापासून आधीच कंत्राटदार त्रस्त आहेत. त्यामुळे बिल न मिळाल्यास काम बंद क रण्याचा इशारा नायडू यांनी दिला.
शिष्टमंडळात उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचिव संजीव चौबे, प्रशांत ठाकरे, अनंत जगनीत, सुरेश गेडाम, नरेंद्र हटवार, विनोद मडावी, विनय घाटे, रफीक अहमद, युवराज मानकर, हाजी नाजमी, किशोर नायडू, राहुल शेंडे, राजू ताजने, अमोल पुसदकर, विनोद दंडारे, नंदू थोठे, आफताब, दीपक अदमने, आतिश गोटे, कैलाश सूर्यवंशी, राजेश चौरे आदींचा समावेश होता.

Web Title: Nagpur NMC contractor demonstrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.