Nagpur: नासुप्रचा अनधिकृत १९ बांधकामावर हातोडा

By गणेश हुड | Updated: March 6, 2024 18:34 IST2024-03-06T18:33:35+5:302024-03-06T18:34:06+5:30

Nagpur News: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम तोडण्याची मोहीम मागील काही महिन्यापासून राबवली जात आहे.

Nagpur: Nasupra hammers on 19 unauthorized constructions | Nagpur: नासुप्रचा अनधिकृत १९ बांधकामावर हातोडा

Nagpur: नासुप्रचा अनधिकृत १९ बांधकामावर हातोडा

- गणेश हूड
नागपूर - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम तोडण्याची मोहीम मागील काही महिन्यापासून राबवली जात आहे. बुधवारी  नासुप्रच्या दक्षिण विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मौजा चिखली  चिखली (खुर्द) येथील  १९ अनधिकृत बांधकाम हटविले.

ही  कारवाई नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती,  मनोजकुमार सुर्यवंशी,. महाव्यवस्थापक अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता  प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता (दक्षिण) पंकज आंभोरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाई प्रसंगी विभागीय अधिकारी  धर्मेंद्र चुटे, शाखा अभियंता सचिन होले, अतिक्रमण समन्वय अधिकारी मनोहर पाटील यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते

Web Title: Nagpur: Nasupra hammers on 19 unauthorized constructions

टॅग्स :nagpurनागपूर