सौर ऊर्जेमुळे नागपूर मनपाची होणार ५३५ कोटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:40 IST2019-02-21T23:37:04+5:302019-02-21T23:40:15+5:30
महापालिका मुख्यालय, झोनसह अन्य कार्यालय, पाणीपुरवठा केंद्र व शाळांच्या इमारतीवर सौर ऊ र्जा संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यातून पुढील काही वर्षात ५३५ कोटींची बचत होणार आहे.

सौर ऊर्जेमुळे नागपूर मनपाची होणार ५३५ कोटींची बचत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका मुख्यालय, झोनसह अन्य कार्यालय, पाणीपुरवठा केंद्र व शाळांच्या इमारतीवर सौर ऊ र्जा संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यातून पुढील काही वर्षात ५३५ कोटींची बचत होणार आहे.
पाणीपुरवठा योजना, कार्यालये व शाळांच्या वीज बिलावर महापालिकेचा वर्षाला १०० कोटींचा खर्च होतो. सौर ऊ र्जा प्रकल्पावर २० वर्षात ९४५ कोटी ३४ लाख ७७ हजार ६०० रुपये खर्च होणार आहे. ही रक्कम २० वर्षात परतफेड करावयाची आहे. यातून ४२ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन कंपन्यांना हे काम विभागून दिले जाणार आहे. यात मे. शांती जी.डी. इस्पात अॅन्ड पॉवर प्रा.लि.रायपूर, मे. रोहित स्टील नागपूर तसेच मे. ब्राईल सोलर एनर्जी प्रा. लि.चेन्नई आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या ज्या इमारतीत मीटरनिहाय एक किलोवॅट वा त्याहून अधिक वीज वापर आहे अशा इमारती वा कार्यालयात सौर ऊ र्जा संयंत्र लावण्यात येणार आहे. सौरऊ र्जा संयंत्र उपलब्ध करणे, लावणे, कार्यान्वित करणे, आदी कामे २४० महिन्यात परतफेडीच्या आधारावर करण्यात येणार आहे. यासाठी शर्ती व अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
प्रति कि.वॅट साठी १२९० रुपये
महापालिकेच्या इमारती वा कार्यालयांच्या छतावर १ ते ७९० कि.वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र बसविण्यात येणार आहे तर पथदिव्यांच्या रस्त्यावर वा महापालिकेच्या योग्य ठिकाणी ६ ते १५ कि.वॅट क्षमतेचे इलेव्हेटेड स्ट्रक्चर उभारण्यात येतील. इलेव्हेटेड स्ट्रक्चरसाठी प्रति कि.वॅट दर महिन्याला १२९० रुपये प्रमाणे २० वर्षात परतफेड करावयाची आहे.
पाणीपुरवठा योजनासाठी अधिक क्षमतेचे संयंत्र
पाणीपुरवठा केंद्र व मलनिस्सारण केंद्रासाठी अधिक वीज लागते. त्यामुळे या प्रकल्पासाठी अधिक क्षमतेचे ग्राऊं ड माऊं टेड स्ट्रक्चर सौर ऊ र्जा संयंत्र उभारण्यात येतील. याची क्षमता २ हजार ते ४ हजार कि.वॅट राहणार आहे. २० वर्षानंतर हा प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित केला जाणार आहे.