नागपूर मनपाच्या १५० शाळा होणार डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:24 IST2019-02-25T13:23:24+5:302019-02-25T13:24:29+5:30
नागपूर महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून १५० शाळांचे वर्ग आता डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.

नागपूर मनपाच्या १५० शाळा होणार डिजिटल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून १५० शाळांचे वर्ग आता डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याला मदत होणार आहे.
मनपाच्या शिक्षण समितीतर्फेशाळा डिजिटल करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिली. उपसभापती भारती बुंदे, सदस्य रिता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी, मनोज गावंडे, मो .इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आदी े उपस्थित होते.
महापालिके च्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्याचा प्रस्ताव बैठकीत पारित करण्यात आला. बनातवाला शाळेसाठी मनपाने चार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. यावर्षी विद्यार्र्थ्यांना गणवेशासह स्वेटर पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच सायकल बँक योजनेंतर्गत दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाना सायकलचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप दिवे यांनी दिली.
प्रारंभी सभापतींनी शाळा निरीक्षकाकडून स्वेटर वाटप केल्याबाबत शाळानिहाय आढावा घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ ते १० वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शासनाच्या निर्णयानुसार नागरी भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्याबाबत विचार करण्यात यावा, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्देंशानुसार व अध्यादेशानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश दिवे यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षात घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.