शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

नागपूर मनपाची कर वसुली मोहीम : ८,६९२ मालमत्ताधारकांवर वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 8:47 PM

मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका  प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून थकबाकी असलेल्या ८,६९२ मालमत्तांवर वॉरंट बजावण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाणार आहे.

ठळक मुद्दे६४५ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका  प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून थकबाकी असलेल्या ८,६९२ मालमत्तांवर वॉरंट बजावण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाणार आहे.२०१८-१९ या वर्षात मालमत्ता कराचे ५०९ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २३ जानेवारीपर्यंत १८८ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षाचा विचार करता याच कालावधीत १३२ कोटींची वसुली झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वसुली ५६ कोटींनी अधिक असली तरी यावर समाधान मानता येणार नाही. उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकी वसुली मोहीम हाती घेतल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.१८८ कोटींच्या वसुलीत ६६ कोटींची जुनी वसुली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील मालमत्ताधारकांकडे २४ कोटींची थकबाकी आहे. ४२ कोटींची प्रकरणे आयुक्तांकडे अपीलात आहेत. यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. पाच हजारापर्यंत थकबाकी असलेल्या १.६९ लाख मालमत्ताधारकांकडे ३१ कोटींची थकबाकी आहे. पाच ते २५ हजारापर्र्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या ६२ हजार असून, त्यांच्याकडे ६३ कोटींची थकबाकी आहे. २५ ते ५० हजारापर्यंत कर थकीत असलेल्या ६,४३५ मालमत्ताधारकांकडे २२ कोटींची थकबाकी आहे. ५० हजार ते १ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या १९७६ मालमत्ताधारकांकडे १३ कोटी थकीत आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या ११९६ मालमत्ताधारकांकडे २४ कोटींचा कर थकीत आहे.थकबाकी वसुलीसाठी सुरुवातीला नोटीस व वॉरंट बजावल्यानंतर ठराविक मुदतीत थकबाकी न भल्यास अशा थकबाकीदारांच्या विरोधात हुकूमनामा काढून चल व अचल संपत्तीचा जाहीर लिलाव केला जाणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत ४५ बोरवेलच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. शहरात जवळपास ३५० बोरवेल केल्या जाणार आहेत. एलवन दरानुसार काम करण्यास इच्छुक असलेल्या कंत्राटदारांना यात थेट संधी दिली जाणार आहे.२८०१ कोटींचे उद्दिष्ट गाठणार२०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्प २८०१ कोटींचा होता. ३१ मार्चपर्यंत अपेक्षित महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात वाढ झाली आहे. शासकीय अनुदानातही वाढ झालेली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांची कामे करण्यात यश आल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.८८ मालमत्ता मनपाच्या नावावर करणारथकबाकी न भरल्याने तीनदा लिलाव केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळालेल्या ८८ मालमत्ता आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया मालमत्ता विभागाने सुरू केली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती कुकरेजा यांनी दिली.शासकीय कार्यालयाकडे ६३ कोटीशहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी आहे. वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा मालमत्ता विभागाचा विचार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर