३८ अतिक्रमण हटविले, १ ट्रक साहित्य केले जप्त
By मंगेश व्यवहारे | Updated: May 31, 2023 14:47 IST2023-05-31T14:41:19+5:302023-05-31T14:47:47+5:30
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाची कारवाई

३८ अतिक्रमण हटविले, १ ट्रक साहित्य केले जप्त
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने गांधीबाग झोन अंतर्गत नवी शुक्रवारी राम कुलरच्या मागे राहणारे देवेंद्र ढगे यांच्या घराची भिंत तोडली. त्यानंतर भोला गणेश चौक येथे अतिक्रमणाची कारवाई केली. ज्यामध्ये रोड व फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. जवळपास ३८ अतिक्रमण हटविले व १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
धंतोली झोन अंतर्गत सरदार पटेल चौक ते मेडिकल चौक ते वंजारी नगर ते शताब्दी चौक ते मनीषनगरपर्यंत अतिक्रमणाची कारवाई केली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत लक्ष्मीनगर ते आठ रस्ता चौक ते खामला ते प्रतापनगर ते माटे चौक ते लक्ष्मीनगर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्ता व फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन अधिक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात भास्कर माळवे, विनोद कोकरडे व अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली.