शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:30 AM

मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती.

ठळक मुद्देघोळ इथला संपत नाही मृत्यूच्या आकड्यांमध्ये विसंगत माहिती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. मनपातर्फे या कालावधीत शहरात झालेल्या मृत्यूच्या माहितीसंदर्भातदेखील असाच घोळ केला आहे. वेगवेगळ्या माहिती अधिकारात एकाच कालावधीत मृत्यू पावलेल्यांची विसंगत आकडेवारी मनपातर्फे देण्यात आली आहे. २०१८ साली प्राप्त झालेल्या माहितीच्या तुलनेत २०२० साली संबंधित कालावधीबाबत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या संख्येत तब्बल १५०० हून अधिक फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन आकडेवारीत एकाच कालावधीतील मृत्यू घटल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत त्या १५०० मृत्यूंची नोंद कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीत होणाऱ्या मृत्यूची नोंद ठेवणे व आवश्यक तेव्हा दाखले उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मनपाकडून यासंदर्भात पारदर्शक कारभाराचे दावे करण्यात येत असले तरी मृत्यू नोंदींसंदर्भातील दोन माहिती अधिकारांनी मनपाची पोलखोल केली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१५ ते २०१९ या वर्षांत झालेल्या महिला व पुरुषांच्या मृत्यू आकडेवारीसंदर्भात विचारणा केली होती. मनपातर्फे ३ फेब्रुवारी २०२० रोजी अर्जावर उत्तर देण्यात आले. यानुसार या तीन वर्षांच्या कालावधीत नागपुरात ७८ हजार ३२७ मृत्यू झाले. यात ४६ हजार ८७८ पुरुष व ३१ हजार ४४९ महिलांचा समावेश होता. २०१५ मध्ये १४ हजार ८९९ पुरुष तर १० हजार १७८ महिला, २०१६ मध्ये १६ हजार ००८ पुरुष तर १० हजार ४३० महिला आणि २०१७ मध्ये १५ हजार ९७१ पुरुष व १० हजार ८४१ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली.दरम्यान ‘लोकमत’कडे याच मुद्द्यांसंदर्भातील माहिती अधिकाराच्या अर्जावर २० फेब्रुवारी २०१८ रोजी मनपाने दिलेली आकडेवारीदेखील आहे. याच्याशी तुलना केली असता मनपाने आकडेवारीत केलेला गोलमाल लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या या आकडेवारीनुसार नागपुरात २०१५ ते २०१७ याच कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले. त्यात ४८ हजार १८२ पुरुष व ३१ हजार ७४४ महिलांचा समावेश होता.दोन्ही माहिती अधिकारातील आकडेवारीची तपासणी केली असता नव्या माहितीमध्ये चक्क जुन्या माहितीच्या तुलनेत मृत्यूची संख्या १ हजार ५९९ ने कमी दाखविण्यात आली आहे. जर २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले होते, तर २०२० च्या माहितीनुसार याच काळातील मृत्यूची संख्या ७८ हजार ३२७ कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका