शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर??

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 20:03 IST

मुंबईकर पाहुण्यांनी वाढविले विमानाच्या तिकिटांचे भाव

शताली शेडमाके

नागपूर : विधिमंडळ अधिवशेनाचा आज (दि. ३०)  शेवटचा दिवस तर उद्या 'थर्टी फर्स्ट'चे सेलिब्रेशन, त्यामुळे अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पाहुण्यांनी आजच परतीचा मार्ग धरलाय. याचाच फायदा विमान कंपन्यांनी घेत तिकिटांचे दर चक्क २१ हजारांपर्यंत वाढविल्याचे दिसत आहे. सध्या नागपूरवरून निघणाऱ्या सर्व फ्लाईट्सचे बुकिंग फुल्ल झाले असून फक्त रात्री पावणे अकराच्या एका विमान कंपनीच्या फ्लाइटमध्ये काही सीट्स उपलब्ध आहेत. मात्र, तिकिटांची किंमत २१ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे.

नागपूर-मुंबई विमानाचा प्रवास साधारणत: ५ हजारांच्या जवळपास आहे. पण अधिवेशन काळात नागपूर-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मंत्री, आमदार, अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी हे विमानप्रवासाला प्राथमिकता देतात. दोन आठवड्यांपासून ही सर्व मंडळी नागपुरात वास्तव्याला होती. तर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून त्यानंतर सर्वांची परतीची लगबग आहे. अनेकांनी आधीच बुकींग करून ठेवलं आहे. तर काहीजण कामकाज आटोपून निघणार आहेत.

थर्टी फर्स्ट, न्यू ईअर साजरा करायला जाणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावर विमानांची उपलब्धता पाहता तिकिटे फुल्ल झाली असून काहीच सीट्स शिल्लक आहेत. याचाच फायदा घेत विमान कंपन्यांनीही तिकीटदरात वाढ केली आहे. शिल्लक तिकिटांचा दर चक्क २१ हजारांवर गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :airplaneविमानnagpurनागपूरMumbaiमुंबईDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरticketतिकिट