नागपूर-मुंबई एसी व्हॉल्वो बस

By Admin | Updated: December 8, 2014 00:52 IST2014-12-08T00:52:36+5:302014-12-08T00:52:36+5:30

पुण्याला आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. यामुळेच या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल असल्याचे दिसते. खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक तर दिवाळीच्या काळात

Nagpur-Mumbai AC Volvo bus | नागपूर-मुंबई एसी व्हॉल्वो बस

नागपूर-मुंबई एसी व्हॉल्वो बस

प्रवाशांसाठी सुविधा : पुण्याच्या प्रवाशांसाठी सुवर्णसंधी
नागपूर : पुण्याला आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. यामुळेच या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल असल्याचे दिसते. खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक तर दिवाळीच्या काळात पुण्याचे भाडे तीन हजार आकारतात. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने पुणेमार्गे वातानुकूलित व्हॉल्वो बससेवा सुरू केली असूून, महामंडळाच्या नागपूर विभागाचे यंत्र अभियंता गजानन नागुलवार यांनी फित कापून या फेरीचे उद्घाटन करून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली.
नागपुरातून एकही व्हॉल्वो बस नसल्याची तक्रार प्रवासी मागील अनेक दिवसांपासून करीत होते. यात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून तर खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत होते. नाईलाजास्तव प्रवाशांना जादा रक्कम मोजून प्रवास करावा लागत होता. परंतु आता एसटी महामंडळाने नागपूर-मुंबई एसी व्हॉल्वो बस उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांची मोठी सुविधा झाली आहे. ही गाडी कारंजा, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, चिखली, देऊळगाव, जालना, सिडको, औरंगाबाद, वाळुंज, तारकपूर, अहमदनगर, शिरुर, पुणे, वाकड, कळंबोली, खारघर, सीबीडी, नेरुळ, वाशी हायवे, मैत्री पार्क, कुनेन, दादर या मार्गाने मुंबईला पोहोचणार आहे. बससेवेच्या शुभारंभप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहेत्रे, उपयंत्र अभियंता राजेंद्र ठाकरे, आगार व्यवस्थापक सिद्धार्थ गजभिये, प्रमोद झाडे, वाहतूक अधीक्षक सतीश अपराजित, गुणवंत तागडे, सहायक वाहतूक निरीक्षक अजय हटेवार, सुनील झोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नागपूरवरून विविध ठिकाणचे प्रवासभाडे
कारंजा - १९० रुपये, तळेगाव - २५३ रुपये, अमरावती ३९५ रुपये, मूर्तिजापूर ५५३ रुपये, अकोला - ६६४ रुपये, खामगाव - ७९० रुपये, चिखली - ९४८ रुपये, देऊळगाव - ११०६ रुपये, जालना - ११६९ रुपये, सिडको - १३२७ रुपये, औरंगाबाद - १३४३ रुपये, वाळुंज १३९० रुपये, तारकपूर - १६४३ रुपये, अहमदनगर - १६४३, शिरुर - १७७० रुपये, पुणे - १९५९ रुपये, वाकड - १९९१रुपये, कळंबोली - २२५९, खारघर - २२७५, सीबीडी २२७५, नेरुळ २२९१ रुपये, वाशी हायवे - २३०७ रुपये, मैत्री पार्क - २३३८ रुपये, कुनेन २३३८ रुपये, दादर - २३५४ रु., मुंबई - २३७० रु.

Web Title: Nagpur-Mumbai AC Volvo bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.