नागपूर एमआयडीसी भागात ट्रेलरने कचरा वेचणाऱ्याला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:39 IST2017-11-17T14:37:43+5:302017-11-17T14:39:14+5:30
हलगर्जीपणे ट्रेलर चालवून त्याच्या चालकाने एका कचरा वेचणाऱ्याला चिरडले. गुरु वारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बार जवळ हा भीषण अपघात घडला.

नागपूर एमआयडीसी भागात ट्रेलरने कचरा वेचणाऱ्याला चिरडले
आॅनलाईन लोकमत
नागपूर : हलगर्जीपणे ट्रेलर चालवून त्याच्या चालकाने एका कचरा वेचणाऱ्याला चिरडले. गुरु वारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बार जवळ हा भीषण अपघात घडला.
एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक अनोळखी इसम रंगोली बार जवळ गुरु वारी रात्री उभा होता. आरोपी ट्रेलर (एमएच ३६/ १७५५) चा चालक अनिल राम गरिबाकुमार (वय २१, रा. मौआईमा, पुरी, अलाहाबाद) याने हलगर्जीपणे ट्रेलर वळवून त्या व्यक्तीला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरातील वातावरण काही वेळेसाठी संतप्त झाले. महेश फुलचंद जयस्वाल (वय ५०) यांनी दिलेल्या तक्र ारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अनिलला अटक केली.