नागपूरच्या मेडिकलमध्ये खाटा १५००, व्हेंटिलेटर २२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:16 IST2018-05-20T00:16:14+5:302018-05-20T00:16:25+5:30
मेडिकलमध्ये दूरदूरुन गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने येतात. परंतु आवश्यक उपकरणांची संख्या वाढविली जात नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणजे, दरदिवशी व्हेंटिलेटरमुळे गोंधळ उडतो, परंतु त्यानंतरही शासन ते उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

नागपूरच्या मेडिकलमध्ये खाटा १५००, व्हेंटिलेटर २२
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये दूरदूरुन गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने येतात. परंतु आवश्यक उपकरणांची संख्या वाढविली जात नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणजे, दरदिवशी व्हेंटिलेटरमुळे गोंधळ उडतो, परंतु त्यानंतरही शासन ते उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
रुग्ण अत्यवस्थ झाला की श्वासोच्छवास घेण्यात अडचण होते. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो. हे काम अत्याधुनिक यंत्र व्हेंटिलेटर करते. मेडिकलमध्ये रोज नव्या येणाऱ्या चार-पाच गंभीर रुग्णांना या व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु अतिदक्षता विभागात असलेले आठ, शस्त्रक्रियेच्या रिकव्हरी वॉर्डात असलेले तीन, पेडियाट्रिक विभागातील एक तर अलिकडेच स्वाईन फ्लू वॉर्डातील पाच व्हेंटिलेटर आहे. हे सर्वच व्हेंटिलेटर रुग्णांना लावण्यात आले आहे. यामुळे नवीन येणाºया गंभीर रु ग्णांचा जीव धोक्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत पाच रुग्ण असेही आहेत ज्यांना तात्काळ व्हेंटिलेटरची गरज आहे, परंतु नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांना हाताने एक पंप दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘बॅग अॅण्ड मास्क व्हेंटिलेशन’ असे म्हणतात. यासाठी २४ तास कुणीतरी हा पंप हाताने दाबावा लागतो. विशेष म्हणजे, व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने हाफकिन कंपनीला पाठविला आहे, परंतु अद्यापही यंत्र उपलब्ध झालेले नसल्याचे सांगण्यात येते.