'सूर्यघर' योजनेत नागपूर आघाडीवर : ३३,६४१ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच

By आनंद डेकाटे | Updated: June 16, 2025 19:05 IST2025-06-16T19:04:44+5:302025-06-16T19:05:29+5:30

Nagpur : १३२.३५ मेगावॅट उत्पादन क्षमता विकसित

Nagpur leads in 'Suryaghar' scheme: Solar power generation sets on the roofs of 33,641 houses | 'सूर्यघर' योजनेत नागपूर आघाडीवर : ३३,६४१ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच

Nagpur leads in 'Suryaghar' scheme: Solar power generation sets on the roofs of 33,641 houses

आनंद डेकाटे, नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
प्रधानमंत्री 'सूर्यघर' - मोफत वीज योजनेत नागपूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे. राज्यभरात एकूण २,१२,६४० सौर ऊर्जा निर्मिती संच लागले आहेत. यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात ३३,६४१ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच लागले आहेत. या माध्यमातून १३२.३५ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याची प्रचंड क्षमता विकसित झाली आहे.

'सूर्यघर' योजनेचे उद्दिष्ट नागरिकांना स्वच्छ आणि स्वस्त वीज पुरवणे आहे. यामध्ये नागपूर आघाडीवर आहे. १५ जून रोजी एकाच दिवशी १२४ नवीन युनिट्स (सोलर रूफ टॉप) बसवण्यात आली. एका दिवसात सर्वाधिक युनिट बसवण्याचा हा विक्रम आहे. नागपुरात सौरऊर्जेकडे नागरिकांचा कल झपाट्याने वाढत आहे. 'सूर्यघर' योजनेद्वारे नागपूर 'सूर्यऊर्जा' अनुभवत आहे.

महावितरणच्या मते, जळगाव १५,८६८ युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे १५६३२ युनिट्ससह त्याच्या मागे आहे. नागपूरने दोन्ही शहरांच्या एकत्रित युनिट्सपेक्षा जास्त युनिट्स बसवले आहेत. नागपूर विभागातील (विदर्भ) इतर जिल्हेही सोलर रूफ टॉप बसवण्यात पुढे आहेत. अमरावती-१२,३३१, वर्धा- ६३७६, बुलढाणा-६२३२, अकोला-६१३०, चंद्रपूर-५६१६, यवतमाळ-४९९८, भंडारा-३५९१, वाशिम-२५६२, गोंदिया-२५११ आणि गडचिरोलीमध्ये ११४१ युनिट बसवण्यात आले आहेत.

Web Title: Nagpur leads in 'Suryaghar' scheme: Solar power generation sets on the roofs of 33,641 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर