शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नागपुरात  दर तासाला मेट्रो सेवेचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:32 IST

दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली.

ठळक मुद्दे प्रवाशांचे स्वागत : दोन्ही मेट्रो छत्रपती चौकात ‘क्रॉस’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली.यावेळी प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. त्यांना मेट्रो सेवा आणि कार्डची माहिती देण्यात आली तसेच मेट्रो स्टेशन येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. सीताबर्डी व खापरी येथून एकाच वेळी निघालेल्या दोन्ही मेट्रो रेल्वे छत्रपती चौक येथे क्रॉस झाल्या तेव्हा प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. यावेळी महामेट्रोतर्फे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ओ अ‍ॅण्ड एम) सुधाकर उराडे, कार्यकारी संचालक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, महाव्यवस्थापक (ट्रॅक) गुरबानी उपस्थित होते.यावेळी प्रवाशांनी मेट्रो सेवेबद्दल प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ नागरिक सुभाष कौशीकर म्हणाले, नागपूर मेट्रोचा अभिमान असून प्रवास करताना आनंद होत आहे. मेट्रोमुळे नागपूरचे सौंदर्य बघण्याची संधी मिळाली. लक्ष्मीचंद मेंढे म्हणाले, तरुण पिढीने मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करावा. मेट्रो प्रवास सुरक्षित असून एक सुखद अनुभव आहे. गृहिणींनी सांगितले की, मेट्रोने प्रत्यक्षात प्रवास करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.पत्रकारांशी संवाद साधताना अनिल कोकाटे म्हणाले, नागरिक बऱ्याच दिवसांपासून मेट्रोच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्याची मागणी करीत होते ती आता पूर्ण झाली आहे. जयप्रकाशनगर आणि राहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनवरून लवकरच प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर